Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर'चे हे आहे मराठी कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 16:57 IST

लवकरच 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. या सिनेमाची तुम्हाला खासियत माहिती आहे का, या सिनेमात जवळपास सर्व कलाकारांचा फौजफाटा मराठी आहे.

ठळक मुद्देहा सिनेमा 15 मार्च 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेसेटवर एकही दिवस बाहेरुन जेवण मागवण्यात आले नाही

लवकरच 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. या सिनेमाची तुम्हाला खासियत माहिती आहे का, या सिनेमात जवळपास सर्व कलाकारांचा फौजफाटा मराठी आहे. अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी, नचिकेत पूर्णापत्रे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

सर्व कलाकार मराठी असल्याने सेटवर रोज पूर्ण क्रूसाठी मराठी जेवण असायचे. त्यामुळे क्रूमेंबर्सना रोज विविध प्रकारच्या मराठी पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळायचा. सेटवर एकही दिवस बाहेरुन जेवण मागवण्यात आले नाही.   

या सिनेमाचे दिग्दर्शन केले तर त्यांची पत्नी भारती मेहरा यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेवर या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. 

या सिनेमाचे शूटिंग मेहरा यांनी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन या सिनेमाचे शूटिंग केले आहे. शूटिंगच्या आधी त्यांनी जवळपास एक महिना जागांची रेकी केली. राकेश ओमप्रकाश मेहरांनी या मेरे प्यारे प्राईम मिनिस्टरमधून देशातली खूप मोठी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमातून आई-मुलांच्या संबंधाना अधोरेखित करण्यात आले आहे. या सिनेमात राष्ट्री पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील देखील दिसणार आहे. जिने यात आईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे संगीत शंकर-एहसान-लॉय यांच्या जोडीने दिले आहे आणि सिनेमातील गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत. . हा सिनेमा 15 मार्च 2019ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेहरा यांनी आतापर्यंत "रंग दे बसंती" आणि "भाग मिल्खा भाग" सारखे दमदार सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आगामी 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' सिनेमाच्या रिलीजची वाट त्यांचे फॅन्स नक्कीच पाहात असतील.  

टॅग्स :राकेश ओमप्रकाश मेहराअतुल कुलकर्णी