Join us  

"खतरों के खिलाडी"मध्ये महावीर सिंह फोगट ?

By admin | Published: July 12, 2017 9:04 AM

महावीर सिंह फोगट यांनी स्टंट बेस्ड रिअॅलिटी टीव्ही शो ""खतरो के खिलाडी"" मध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -  कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांचे वडील व प्रशिक्षक पहलवान महावीर सिंह फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ""दंगल"" सिनेमानं बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमाच्या निमित्तानं गीता-बबितासहीत महावीर सिंह फोगट यांचीही कहाणी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. पण आता तुम्ही महावीर सिंह फोगट यांना प्रत्यक्षात ऑनस्क्रीन दंगल करताना पाहू शकता. कारण महावीर सिंह फोगट यांनी स्टंट बेस्ड रिअॅलिटी टीव्ही शो ""खतरों के खिलाडी"" मध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
 
खरंतर महावीर सिंह फोगट यांची मुलगी गीता फोगट ""खतरों के खिलाडी 8"" मध्ये भाग घेत आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, गीतानं हे आव्हान स्वीकारलं तर तिला जिंकण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. गीताला आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि ती कधीही प्रयत्न करणं सोडत नाही. 
 
पुढे ते असंही म्हणाले की,  गीतानं ""खतरों के खिलाडी"" शो जिंकावा, अशी माझी इच्छा आहे. तसंच जर संधी दिल्यास मीदेखील स्वखुशीनं ""खतरो के खिलाडी""मध्ये सहभाग घेईन कारण मी मानसिक व शारीरिक दृष्ट्या मजबूत आहे. 
 
आणखी बातम्या वाचा
(दंगल ठरला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट)
(अब दंगल होगा ! "दंगल"ने नावावर केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड)
(तुमच्यात हिंमत असेल तर समोरुन वार करा - बबिता फोगट)
दरम्यान, सोमवारी (10 जुलै ) जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारतीय कुस्तीपटू बबिता फोगटने ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे.  
या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत बबिता फोगटने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.  ""तुम्ही कितीही प्रयत्न केले. तरी भारतीयांचे धैर्य किंचितही कमी होणार नाही. तुमच्यात हिंमत असेल तर समोरुन वार करा, तुम्हाला आमच्या ताकदीची कल्पना येईल"", असे ट्विट बबितानं केलं आहे. 
 
दहशतवाद्यांनी सोमवारी (10 जुलै ) रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह 32 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत. 
 
याचबरोबर अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यामागे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात असून पाकिस्तानी दहशतवादी इस्माईल या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलीस महासंचालक मुनीर खान यांनी दिली आहे.