Join us

करिना, अमृतापाठोपाठ महिप कपूर व सीमा खान यांनाही कोरोना, बॉलिवूडमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 10:43 AM

Maheep Kapoor and Seema Khan test positive for Covid-19 : काही दिवसांपूर्वीच करण जोहरने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत करिना, अमृता, महिप कपूर, सीमा खान, रिया कपूर हजर होत्या.

Maheep Kapoor and Seema Khan test positive for Covid-19 :  ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांचं टेन्शन वाढलं असताना आणि कोरोनाचा धोका कायम असताना बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ माजली आहे. काल अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor, Amrita Arora) व अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. आता करिना व अमृतापाठोपाठ अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान (Seema Khan) आणि संजय कपूरची पत्नी महिप कपूर (Maheep Kapoor) या दोघींची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

काही दिवसांपूर्वीच करण जोहरने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत करिना, अमृता, महिप कपूर, सीमा खान, रिया कपूर हजर होत्या. त्याआधी रिया कपूर हिनं आयोजित केलेल्या पार्टीतही करिना, करिश्मा, मलायका अरोरा, मसाबा गुप्ता अशा सगळ्याजणी एकत्र आल्या होत्या. या पार्ट्या भोवल्याचं आता मानलं जात आहे.संजय कपूरने पत्नी महिप कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महिप कोरोना पॉझिटीव्ह आहेत. काही सौम्य लक्षणं आहेत आणि तिने स्वत:ला आयसोलेट करून घेतलंय, असं त्याने सांगितलं.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, सीमा खान ही सर्वप्रथम कोरोना पॉझिटीव्ह आढळली. सीमा व महिप या दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघींनाही कोरोना झाल्याने त्यांच्यासोबत असलेले पार्टीतील अन्य लोकांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची शक्यता आहे.दरम्यान मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करण जोहर राहत असलेल्या इमारतीत आणि परिसरात कोविड 19 चाचणी आणि स्क्रिनिंग सुरू केली आहे. करिना व अमृता या दोघींच्या संपर्कात आलेल्या 30 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

करिना आता ठीक- रणधीर कपूरकरिना कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर तिचे वडील रणधीर कपूर यांनी तिच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. करिनाला सौम्य ताप होता. तिची कोव्हिड टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. पण आता ती अगदी ठणठणीत आहे आणि सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. ती लवकरच पूर्णपणे ठीक होईल, असे रणधीर ‘ई-टाइम्स’शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :करिना कपूरकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड