साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar ) यांच्या लग्नाला २० वर्षे पूर्ण झाली. २००५ साली लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांची प्रेम कहाणी कोणत्याही परी कथेपेक्षा कमी नाही. या दोघांची जोडी ही प्रेक्षकांची आवडती आहे. हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. लग्न वाढदिवसाच्या (Mahesh Babu and Namrata Shirodkar Wedding Anniversary) निमित्तानं नम्रतासाठी महेश बाबूनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं नम्रताला शुभेच्छा दिल्या आहेत.
महेश बाबूनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये महेश बाबूनं नम्रतासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं लिहलं, "तू, मी आणि सुंदर २० वर्षे… मी कायम तुझ्याबरोबर आहे". अभिनेत्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
तुम्हाला दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली हे माहितीये का? महेश बाबू साऊथचा अन् नम्रता मराठमोळी. मग दोघांमध्ये प्रेम फुललं कस? तर ही सुंदर अशी लव्हस्टोरी सुरू झाली होती एका चित्रपटाच्या सेटवर. त्यांची पहिली भेट १९९९ मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. जेव्हा त्याने अभिनेत्रीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. यानंतर दोघांनी काही वर्ष एकमेंकाना डेट केलं आणि यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, अभिनेता नम्रताशी लग्न करण्याबाबत कुटुंबातील सदस्यांशी बोलण्यास घाबरत होता. कारण त्याला वाटत होते की जर अभिनेत्री आपल्यापेक्षा चार वर्षांनी मोठी असेल तर आई-वडील मान्य करणार नाहीत. महेश बाबूने सर्वप्रथम आपल्या बहिणीला या नात्याबद्दल कल्पना दिली होती. पण, नंतर जेव्हा त्याच्या आई-वडिलांना या नात्याबद्दल कळले, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. यानंतर दोघांनी २००५ मध्ये घरच्यांच्या मान्यतेने लग्न केले. महेश बाबू आणि नम्रता हे दक्षिणेतील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत, जे आनंदी जीवन जगत आहेत. त्या दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुलं झाली. अनेकवेळा दोघे मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतात.