बॉलिवूडमध्ये थोड्या कालावधीसाठी का होईना पण स्वत:च्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता शिरोडकर. आज नम्रताचा वाढदिवस. कधी काळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी आणि सौंदर्याने घायाळ करणारी नम्रता आता दोन मुलांची आई आहे. ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर असलेल्या नम्रतात गेल्या काही वर्षांत बराच बदल झालाय.
नम्रता मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात आहे. तिची बहीण शिल्पा शिरोडकर ही सुद्धा अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
नम्रता शिरोडकरने १९९३ साली ‘मिस इंडिया’ हा किताब जिंकला आणि बॉलिवूडची कवाडे तिच्यासाठी उघडी झालीत. पहिल्याच चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाचे नाव होते, ‘जब प्यार किसीसे होता है’. या चित्रपटाने नम्रताचा चेहरा लोकांच्या डोळ्यांत भरला. पण तिला खरी ओळख दिली.
१९९९ साली आलेल्या ‘वास्तव’ चित्रपटात संजय दत्त सोबत काम केल्यावर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलले. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला विविध पुरस्कार मिळाले. याचदरम्यान नम्रता साऊथ इंडस्ट्रीकडेही वळली. ‘वास्तव’ याच सिनेमाच्या दरम्यान नम्रता शिरोडकर व महेश मांजरेकरांच्या अफेअरच्या बातम्या या चित्रपटाच्या सेटवर महेश व नम्रता एकमेकांजवळ आलेत, असे म्हटले जाते. पण हे नाते फार काळ चालले नाही. कारण महेश मांजरेकर विवाहित होते.
‘वास्तव’नंतर 2000 मध्ये ‘वामसी’ हा तेलगू सिनेमा नम्रताने साईन केला. या चित्रपटात नम्रताचा हिरो होता तो महेशबाबू. पहिल्याच नजरेत महेशबाबू शिल्पाच्या प्रेमात पडला. नम्रताही महेशबाबूमध्ये गुंतली. पण मीडियाच्या नजरेपासून दोघांनीही हे प्रेम लपवून ठेवले. नम्रताबद्दल महेशबाबूने सर्वप्रथम त्याच्या बहिणीला सांगितले होते. चार वर्षे नम्रता व महेशबाबूंनी आपले प्रेम जगापासून लपवून ठेवले आणि नंतर 10 फेब्रुवारी2005 मध्ये लग्न केले. नम्रताला एक मुलगा व एक मुलगी असून ती सध्या हैदराबादला तिच्या परिवारासोबत राहते.