नवी दिल्ली ।
दक्षिण भारतीय अभिनेता महेश बाबूचा चित्रपट 'सरकारी वारू पाटा' मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही दमदार प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं चांगली कमाई केली. दरम्यान या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर अभिनेता विजय बाबूने आणखी एका नवीन चित्रपटाकडे आपला मोर्चा वळवला आहे. आपल्या आगामी चित्रपटासाठी अभिनेता पुन्हा एकदा दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे.
ऑगस्टमध्ये सुरू होणार शुटींग समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेता महेश बाबू हा दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत 'SSMB 28' या चित्रपटासाठी काम करणार आहे. याबाबत आधीच माहिती समोर आली होती मात्र आता शुटींगचे डिटेल्सही आता समोर आले आहेत. श्रद्धा कृष्णा निर्मित या चित्रपटाच्या शुटींगला ऑगस्टपासून सुरूवात होईल. तसेच चित्रपटात महेश बाबू सोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे.
एस एस राजमौलींच्या चित्रपटातही झळकणार महेश बाबू दरम्यान, 'SSMB 28' या चित्रपटानंतर अभिनेता पुढील दोन वर्षांसाठी खूप व्यस्त असणार आहे. कारण रिपोर्टनुसार त्याने एस एस राजमौलीच्या पुढील प्रोजेक्टसाठी साइन केले आहे. राजमौली यांच्या आगामी चित्रपटावर २०२३ मध्ये काम सुरू होणार आहे. तसेच महेश बाबूच्या 'SSMB 28' या चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना २०२३ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेसोबत झळकणार 'सरकार वारू पाटा' या चित्रपटातील अभिनेत्री किर्ती सुरेश आणि महेश बाबू यांच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र आगामी चित्रपटात महेश बाबू पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. त्यामुळे ही नवीन जोडी प्रेक्षकांना किती प्रमाणात भुरळ घालते हे पाहण्याजोगे असेल. दुसरीकडे पूजा हेगडेचे मागील काही चित्रपट पाहिले तर आगामी चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळण्याची शक्यता आहे.