तेलुगू सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतोय. सध्या तो फिटनेसवरदेखील भर देतो असतो. महेशबाबूचा फिटनेस फ्रिक बघून पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर प्रभावित झाली आहे. नम्रताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत महेश बाबू घाम गाळताना दिसतोय.
हा व्हिडीओ शेअर करताना नम्रता लिहिते, ''परिपूर्णतेच्या दिशेकडे धावणे सुरु आहे. व्यायामाचा रोजचा डोस !! स्टेफिट, लॉकडाऊनडायरी, स्टेहोम.'' असे हॅशटॅग देण्यात आले आहेत.
2000 साली तेलुगू सिनेमा वापसी च्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास 5 वर्षे दोघ एकमेकांना डेट करत होते. 2005मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले. नम्रता महेश बाबूपेक्षा जवळपास 3 वर्षांनी मोठी आहे.
फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेल्या नम्रताने सलमान खान आणि ट्विंकल खन्नाच्या ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू केला होता. मात्र लग्नानंतर नम्रता सिनेमांमध्ये कमी आणि संसार जास्त रमली. महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.