फिल्मस्टार आणि त्यांचा वाढदिवस चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. आपल्या लाडक्या फिल्मस्टारला शुभेच्छा देण्यासाठी चाहते वेगवेगळ्या युक्त्या शोधून काढतात. काही जण एक दिवस आधीपासूनच त्यांच्या घराबाहेर आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी बसून रहातात. तर काही जण त्यांचे पोस्टर्स लावून त्यांना शुभेच्छा देतात. दोन दिवसांपूर्वीच साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा वाढदिवस झाला. देशभरात महेश बाबूच्या फॅन्सनी त्याचा वाढदिवस दिमाखात साजरा केला.
त्यादिवशी #जन्मदिनमुबारकमहेशबाबू #HBDSuperStarMAHESH #HappyBirthdayMaheshBabu यांसारखे हॅस टॅग जगभरात ट्रेन्ड करत होते.