Join us

आलिया रणबीरच्या प्रेमात! अखेर महेश भट्ट यांनी दिली कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:30 AM

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे.  आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे.

ठळक मुद्दे‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे.  आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. होय,  आलिया व रणबीर रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली महेश भट्ट यांनी दिली आहे.

‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट आलिया व रणबीरच्या रिलेशनशिपवर बोलले. आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आहे, हे जगजाहिर आहे. हे तुम्हीही समजू शकता. मला रणबीर आवडतो. तो व्यक्ति म्हणून खूप चांगला आहे. आता हे नाते कसे पुढे न्यायचे, हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्या दोघांचा आहे. ते लग्नासारख्या कुठल्या मुक्कामाला पोहोचू इच्छितात की आणखी काही, हे त्यांचे त्यांनी ठरवावे. मी यावर बोलणारा, निर्णय देणारा कुणीही नाही. त्यांना आपले नाते पुढे त्यांना पूर्ण अधिकार आहे. आयुष्य आपल्या अटींवरचं जगायचे असते. त्यांचे नाते कुठल्या वळणावर जाते,याची आपण प्रतीक्षा करूया. तूर्तास तरी आपण केवळ प्रतीक्षा करू शकतो, असे महेश भट्ट या मुलाखतीत म्हणाले.

रणबीर व आलियाच्या लग्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. ते कोर्ट मॅरेज करू इच्छितात की आणखी काही, यावर मी बोलणार नाही. त्यांच्या रिलेशनशिप कसे पुढे जाते, यावर सगळे काही अवलंबून आहे, केवळ एवढेच ते बोलले.लवकरच आलिया व रणबीर ख्रिश्मस सेलिबे्रशनसाठी पॅरिसला जाणार आहे. रणबीरचे कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत असणार आहे. या सेलिब्रेशननंतर कदाचित एक मोठी बातमी आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा करूयात.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरमहेश भट