महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:44 AM2020-07-19T11:44:25+5:302020-07-19T11:44:49+5:30

वाचा काय म्हणाले महेश भट...

mahesh bhatt tweets he does not want people to remember him as a holy man gets trolled | महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!

महेश भट यांनी कंगनावर साधला निशाणा; युजर्स म्हणाले, आम्ही इतके मूर्ख नाही...!

googlenewsNext
ठळक मुद्देलोक तुला माफ करणार नाहीत,’ असे एका युजरने लिहिले.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी प्रचंड ट्रोल होत आहेत. करण जोहर, सलमान खान, आलिया भट आणि महेश भट नेटक-यांच्या निशाण्यावर आहेत. कंगना राणौतने सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित केल्यावर तर नेटक-यांनी या सर्वांना सळो की पळो करून सोडले आहे. एका ताज्या मुलाखतीत कंगनाने करण जोहर व महेश भट यांच्यावर निशाणा साधला. कंगनाच्या या आरोपांना उत्तर देत महेश भट यांनी एक ट्वीट केले आणि मग काय, महेश भट या ट्वीटवरूनही प्रचंड ट्रोल झालेत.

‘भावी पीढीने मला आठवणीत ठेवावे, असे मला मुळीच वाटत नाही. जगाने मला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखावे, असेही मला वाटत नाही. अनेक जण आठवणीत राहण्यासाठी बराच खटाटोप करतो. आपच्या नावावर विमानतळ व्हावे, टपालाचे तिकिट निघावे, स्मारक उभारले जावे, असे अनेकांना वाटते. मात्र स्थायी जीवन अशक्य आहे. स्थायित्वाचा शोध मनुष्याची शोकांतिका आहे, ’ असे ट्वीट महेश भट यांनी केले.

याशिवाय महेश भट यांनी एक कोटही शेअर केले. ‘खरे शब्द सुस्पष्ट नसतात. गोड शब्द सत्य नसतात. समझदार व्यक्तिंना त्यांचे म्हणणे सिद्ध करण्याची गरज नसते. ज्यांना त्यांचे म्हणणे सिद्ध करण्याची गरज आहे, ते बुद्धिमान नसतात,’ असे हे कोट आहे. या ट्वीटद्वारे महेश भट यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाला टोला हाणला. मात्र झाले उलटेच महेश भट यांनी कंगनाला लक्ष्य करत हे ट्वीट केले खरे पण या ट्वीटनंतर खुद्द तेच कधी नव्हे इतके ट्रोल झालेत.

तुला चांगला व्यक्ती म्हणून आठवणीत ठेवायला आम्ही मूर्ख नाही, असे एका युजरने यावर लिहिले. तर अन्य एका युजरने आणखी पुढे जात महेश भट यांना लक्ष्य केले. ‘रोज ट्रोल होण्यासाठी येतो. कितीही खुलासे कर, स्पष्टीकरण दे. लोक तुला माफ करणार नाहीत,’ असे या युजरने लिहिले.

Web Title: mahesh bhatt tweets he does not want people to remember him as a holy man gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.