मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. गौरीदेखील अभिनेत्री आहे. तिने पांघरुण या चित्रपटात काम केले. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर आता तिचा भाऊ सत्या मांजरेकरने तिचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतेच सत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने गौरीची प्रशंसा केली आहे. त्याने ‘पांघरुण’ या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले की, गौरी तुला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा अॅवॉर्ड मिळाला, त्याबद्दल तुझे खूप कौतुक.