Join us

माही विजने दिला होता जुळ्या मुलांना जन्म; दोघांपैकी गमावलं एक नवजात बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 13:10 IST

Mahhi vij: माही आणि जय यांना तारा नावाची एक गोड मुलगी आहे. मात्र, तिच्यासोबत असलेल्या एका बाळाला त्यांनी गमावलं.

कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे माही विज (mahhi vij) आणि जय भानुशाली (jay bhanushali). या दोघांच्या नात्याची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. या दोघांचं एकमेकांवर जितकं प्रेम आहे तितकाच एकमेकांप्रती आदरदेखील आहे. या दोघांना तारा नावाची एक लहानशी लेक असून तीदेखील सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. विशेष म्हणजे ताराचे आई-वडील असलेल्या जय-माहीने त्यांचं एक नवजात बाळ गमावलं आहे. एका मुलाखतीमध्ये माही पहिल्यांदाच याविषयी व्यक्त झाली.

माहीने अलिकडेच इ टाइम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या IVF प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं. यावेळी बोलत असताना मी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मात्र, त्यातलं एक बाळ आम्हाला गमवावं लागलं, असं तिने सांगितलं.

"IVF चाचणीद्वारे झालेल्या प्रेग्नंसीमध्ये एकापेक्षा जास्त मूल होण्याची शक्यता असते. आम्हाला २ मुलं होणार होते. पण, या दोन बाळांपैकी एक बाळ फार काळ जगू शकत नाही असं डॉक्टरांनी आधीच आम्हाला सांगितलं होतं. मी देवाकडे सतत प्रार्थना करत होते, की आमच्या नशीबात दोन बाळांचं सुख नसेल. पण, निदान एक बाळ तरी आमच्या पदरात दे", असं माही म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळी माझे एग्स फ्रीज केले त्यावेळी माझं वय ३४ वर्ष होतं. पण, अनेक प्रयत्न करुनही मी आई होऊ शकत नव्हते. त्यामुळे मी करिअरमधून ब्रेक घेतला. डॉक्टर बदलले. शेवटी वयाच्या ३६ व्या वर्षी आम्ही पुन्हा प्रयत्न केला आणि आम्ही यशस्वी झालो. मी त्यावेळी गुरुद्वारामध्ये गेले आणि सगळं वाहे गुरुंवर सोडलं. त्यावेळी मी जुळ्या मुलांची आई होणार आहे असं जयने मला सांगितलं. ही गोष्ट आम्ही आमच्या जवळच्या लोकांना सांगितली.पण, सुरुवातीचे ३ महिने मी खूप काळजी घेतली. घरातून कुठेच बाहेर गेले नाही. केवळ सोनोग्राफीसाठी बाहेर पडायचे." 

टॅग्स :जय भानुशालीसेलिब्रिटीसिनेमा