Join us

पायल घोषच्या आरोपांवर भडकली माही गिल, अनुराग कश्यपला केला सपोर्ट

By अमित इंगोले | Updated: September 21, 2020 09:35 IST

एक दिवसाआधीच पायलने पंतप्रधानांना टॅग करून ट्विटरवर लिहिले होते की, अनुराग कश्यपने तिच्यासोबत गैरवर्तन आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने पंतप्रधानांना यावर अ‍ॅक्शन घेण्याची मागणी केलली.

सध्या अभिनेत्री पायल घोष दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून चर्चेचा विषय ठरत आहे. पायल घोषने २०१५ मध्ये अनुरागवर हाच आरोप केला होता. आपल्या आरोपांमध्ये पायलने अनुरागसोबत काम केलेल्या इतरही काही अभिनेत्रींची नावे घेतली होती. पायलने दावा केला की, पायल घोष म्हणाली होती की, अनुरागच्या सांगण्यावरून हुमा कुरेशी, रिचा चड्ढा आणि माही गिलसारख्या अभिनेत्री त्याच्यासोबत काहीही करायला तयार होतात. पायलच्या या आरोपावर माही गिलने प्रतिक्रिया दिली आहे.

ई टाइम्ससोबत बोलताना माही म्हणाली की, 'मला मुळात या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाहीये. आपल्या चहूकडे तसंही खूप काही निगेटीव्ह होत आहे. कुणाचंही नाव घेणं फार सोपं झाल आहे. कारण काय तर त्याने(अनुराग) आम्हाला लॉन्च केलं होतं. मला केवळ इतकंच सांगायचं आहे की, मी अनुराग खूपप आधीपासून ओळखते. आम्ही गेल्या काही वर्षांपासून संपर्कात नाही आहोत. पण इतकं नक्कीच आहे की, अनुराग त्याच्या कोणत्याही कलाकाराला असं बोलू शकत नाही. आता मला यावर काहीही बोलायचं नाही'.

माही गिलने अनुराग कश्यपसोबत 'गुलाल' आणि 'देव डी'सारख्या सिनेमात काम केलं होतं. हे दोन्ही सिनेमे माही गिल आणि अनुराग कश्यपच्या करिअरमधील सर्वात बेस्ट सिनेमे मानले जातात. अनुरागसोबत माहीचा पहिला सिनेमा 'गुलाल' होता पण 'देव डी' आधी रिलीज झाला होता.

दरम्यान एक दिवसाआधीच पायल घोषने पंतप्रधानांना टॅग करून ट्विटरवर लिहिले होते की, अनुराग कश्यपने तिच्यासोबत गैरवर्तन आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने पंतप्रधानांना यावर अ‍ॅक्शन घेण्याची मागणी केलली. पण त्यानंतर अनुरागने स्पष्टीकरणे देत तिने लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले होते. आता तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज अनुरागच्या सपोर्टमध्ये समोर आले आहेत.

अनुरागने फेटाळले पायलचे आरोप

अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले़ क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम़ मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे तो म्हणाला.

अभिनेत्री पायल घोषचे आरोप

‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा. या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षण देशाला पाहू दे. यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे़ कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते.

हे पण वाचा :

थोडी तर मर्यादा पाळा...! लैंगिक शोषणाच्या आरोपावर अनुराग कश्यप अखेर बोलला

SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

अनुराग कश्यपवर अभिनेत्रीकडून लैंगिक शोषणाचा आरोप; पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

टॅग्स :माही गिलअनुराग कश्यपबॉलिवूडमीटू