‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. आज (13 सप्टेंबर) हा महिमाचा वाढदिवस. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. सध्या ती इतकी बदललीयं, की तिला ओळखणेही कठीण आहे.
महिमा चौधरीचा सुभाष घईंवर मोठा आरोप; म्हणाली, तेव्हा केवळ चौघांनी साथ दिली...!!
सुभाष घईंवर कास्टिंग काऊचचा आरोपसुभाष घईंनी महिमाला पहिला ब्रेक दिला. पण याच सुभाष घईंवर पुढे महिमाने कास्टिंग काऊच सारखा गंभीर आरोप केला. असे म्हणतात की, महिमा व सुभाष घई यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार, 5 वर्षांत महिमाला घईंचे 3 सिनेमे करायचे होते. असे न केल्यास महिमाला आपल्या उत्पन्नातील 35 टक्के भाग घईंना द्यावा लागेल. हाच करार पुढे महिमा व सुभाष घईंच्या वादाचे कारण ठरला.
एकीकडे सुभाष घई यांनी महिमाला विदेशात परफॉर्म करण्यापासून रोखले तर दुसरीकडे महिमाने घईंवर करार तोडून 'ताल'मध्ये तिच्याजागी ऐश्वयार्ला घेतल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर यानंतर तिने सुभाषघईंवर अप्रत्यक्षपणे कास्टिंग काऊचचा आरोपही ठेवला.
लग्नापूर्वी प्रेग्नंट
2006 मध्ये महिमाने अचानक लग्न केल्याची खबर आली. घाईघाईत केलेल्या या लग्नामागे प्रेग्नंसी हे कारण होते. म्हणजेच महिमा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. महिमाने बिझनेसमॅन बॉबी मुखजीर्सोबत लग्न केले. लग्नानंतर काहीच महिन्यात तिने मुलीला जन्म दिला होता. आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली असून सिंगल मदर आहे.
लिएंडर पेसवर केले होते गंभीर आरोप
महिमा सर्वाधिक चर्चेत आली ती दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसवर केलेल्या आरोपामुळे. होय, 2005 मध्ये महिमा व लिएंडर रिलेशनशिपमध्ये होते. पण याचकाळात लिएंडरची संजय दत्तची एक्स-वाईफ रिया पिल्लईसोबतची जवळीक वाढली होती. (पुढे लिएंडरने रियासोबत लग्नही केले. नंतर त्यांचा घटस्फोटही झाला.) महिमाला हे कळले आणि तिने लिएंडरसोबत ब्रेकअप केले. यानंतर महिमाने जाहिरपणे लिएंडरने प्रेमात दगा दिल्याचा आरोप केला होता. लिएंडर पेसकडून प्रेमात दगा मिळाल्याचे तिने सांगितले होते. ‘लिएंडर एक उत्कृष्ट टेनिस प्लेअर आहे, पण माणूस म्हणून अजिबात चांगला नाही. त्याच्या आयुष्यात दुसरी महिला आहे, हे कळल्यावर मला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. उलट मी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाली आहे,’ असे महिमा म्हणाली होती.