Join us

लाइमलाइटपासून दूर आहे महिमा चौधरीची लेक; सौंदर्याच्या बाबतीत अनेक स्टारकिडला देतीये टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 14:05 IST

Mahima chaudhry: आर्यानाच्या डोळ्यांच्या आणि गोड स्माइलच्या प्रेमात आज असंख्य जण आहेत.

गेल्या काही काळात इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची सर्वाधिक चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच निसा देवगण (nisa devgn), खुशी कपूर, अनन्या पांडे, सुहाना खान (suhana khan)  हे स्टारकिड्स तर कायम लाइमलाइटमध्येच असतात. परंतु, सध्या नेटकऱ्यांमध्ये अशा एका स्टारकिड्सची चर्चा रंगली आहे जी कायम लाइमलाइटपासून दूर असते. ही स्टारकिड आहे अभिनेत्री महिमा चौधरी (mahima chaudhry) हिची लेक आर्यना चौधरी हिची.

आर्याना सौदर्याच्या बाबतीत अगदी महिमा चौधरीसारखीच सुंदर आहे. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यांच्या आणि गोड स्माइलच्या प्रेमात आज असंख्य जण आहेत. मात्र, एक स्टारकिड असूनही ती कायम सोशल मीडियापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच महिमाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात ती तिच्या कुटुंब आणि काही फॅमिली फ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करत होती. यामध्ये आर्यानाची झलक पाहायला मिळाली.

दरम्यान, आर्यानाला देखील महिमासारखंच इंडस्ट्रीत काम करायचं आहे. एका कार्यक्रमात महिमासोबत सहभागी झालेल्या आर्यानाने इंडिस्ट्रीमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आर्याना कोणत्या प्रोजेक्टमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार हे पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

टॅग्स :बॉलिवूडमहिमा चौधरीसेलिब्रिटीसिनेमा