Join us

'रात्रीस खेळ चाले'मध्ये माई आणि शेवंतामधले द्वंद कोणत्या थराला जाणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 07:15 IST

Ratris Khel Chale 2 Marathi Serial : ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

नेने वकिलांच्या मदतीने शेवंताला नाईकांच्या वाड्यासमोरच घर मिळतं. एकीकडे माई मात्र अण्णांना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे शेवंता हार न मानता धीटपणे सगळ्या परिस्थितीला सामोरी जातेय. माईंच्या कणखरपणापुढे अण्णा देखील काहीसे हतबल झालेले दिसत आहेत. माई आणि शेवंताची खुन्नस मालिकेची रंजकता अजून वाढवत आहेत. अशातच शेवंताने सोशल मीडियावर तिचा, माई आणि अण्णांचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्या फोटोला कॅप्शन द्यायला सांगितलं आहे. या झक्कास फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अण्णा आणि शेवंताच्या जुगलबंदीमध्ये अण्णांचं काय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले