Join us

पंकज त्रिपाठींना व्हायचंय पंतप्रधान?; म्हणाले, 'निर्णय घेण्यात...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 1:56 PM

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथम काय करणार हे सांगितलं.

बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (pankaj tripathi)  सध्या त्यांच्या 'मैं अटल हूँ' या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला. विशेष म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची बरीच चर्चा रंगली होती. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. या सिनेमादरम्यान पंकज त्रिपाठी यांची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका दिवसासाठी जर मी  पंतप्रधान झालो तर काय करेन हे सांगितलं आहे.

अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना 'एका दिवसासाठी देशाचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर काय कराल?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. "मी पंतप्रधान झालोय या गोष्टीवर विश्वास ठेवण्यातच माझा एक दिवस निघून जाईल. तर मी निर्णय कसे काय घेणार.  विश्वास ठेवण्यावर आणि ते पचवण्यातच माझा दिवस संपेल. जेव्हा समजेल तेव्हा दिवस संपला असेल", असं पंकज त्रिपाठी म्हणाले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये त्यांनी नेपोटिझ्मवर सुद्धा भाष्य केलं. नेपोटीझ्म हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होतं. फक्त ते उघडपणे मांडलं जात नाही किंवा त्यावर कोणी बोलत नाही. पंकज त्रिपाठी यांचा 'मैं अटल हूं' हा सिनेमा नुकताच १९ जानेवारीला रिलीज झाला. परंतु, या सिनेमाने ५ दिवसात १० कोटीं कमाई सुद्धा केलेली नाही. त्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहे.

टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा