Join us

'माझी तुझी रेशीमगाठ'च्या मिनाक्षी वहिनीची हवाच,'चला हवा येऊ द्या'मधील हा अभिनेता आहे पती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 9:00 AM

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांसारखे  प्रसिद्ध चेहरे मालिकेत असल्यामुळे रसिकांमध्ये मालिका सुरु होण्याआधीच उत्सुकता वाढली होती.

नुकतीच सुरु झालेली 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतले कलाकारही रसिकांच्या चांगल्याच ओळखीचे आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांसारखे  प्रसिद्ध चेहरे मालिकेत असल्यामुळे रसिकांमध्ये मालिका सुरु होण्याआधीच उत्सुकता वाढली होती. मालिकेची कथा, तगडी कलाकारांची फौज, यामुळे अतिशय कमी वेळेत मालिका रसिकांची आवडती मालिकांपैकी एक बनली आहे. मालिकेत आता हळूहळू इतरही कलाकार समोर येऊ लागले आहेत. 

 

नुकतेच मालिकेत मीनाक्षी नावाच्या व्यक्तीरेखेची एंट्री झाली आहे. मीनाक्षी नेहाची वहिनीची भूमिका साकारत असून नेहाचे दुसरे लग्न होण्यासाठी तिला स्थळं सुचवत असते. नेहाचा मात्र दुसरे लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार असतो. म्हणून वहिनीने सुचवलेले वकिलाचे स्थळ ती नाकारते.नेहाच्या वहिनीची भूमिका नेगिटीव्ह स्वरुपाची आहे.अल्पावधीतच वहिनीच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्रीनेही रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.वहिनीच्या भूमिकेत झळकणाऱ्या  अभिनेत्री नाव आहे 'स्वाती देवल'.

पण तुम्हाला माहिती आहे का ? स्वातीने यापूर्वीही काही मालिकेत काम केले आहे. 'कुंकू', 'कळत नकळत', 'पारिजात', 'वादळवाट', 'विवाहबंधन', 'फु बाई फु', 'पुढचं पाऊल' यांसह अनेक मालिकांमध्ये स्वाती देवलने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठीतच नव्हे तर हिंदीतही स्वातीने काम केले आहे. 'मिसेस तेंडुलकर' या गाजलेल्या मालिकेतही स्वातीने भूमिका साकारली होती.

स्वाती देवलही उत्कृष्ट अभिनेत्री आहे. मोठ्या मेहनतीने  इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहेत.जितकी प्रसिद्ध स्वाती देवल आहे तितकाच तिचा पतीदेखील प्रसिद्ध आहे.'चला हवा येऊ द्या' विनोदी कार्यक्रमात तुषार देवल हा संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो.

तुषारनेही 'घडलंय बिघडलंय', 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज', 'रणवीर कॅफे', 'हास्यसम्राट' अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली आहे.स्वाती आणि तुषार यांचे लव्हमॅरेज आहे. काही वर्ष डेट केल्यानंतर 2003 मध्ये दोघांनीही लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. 

दोघांनीही त्यांच्या संघर्षाच्या काळात एकमेकांना साथ दिली.दोघेही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात दोघेही खुश आहेत. आज दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमावत असून सुखाने दोघांचा संसार सुरु आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्याश्रेयस तळपदे