Sonali Kulkarni: 'देऊळ', 'गुलाबजाम', 'अगं बाई अरेच्चा २', 'गारभीचा पाऊस', 'गुलमोहर' यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). अभिनेत्रीने मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. सोनालीचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहून आपले आगामी प्रोजेक्ट्स तसेच वैयक्तिक गोष्टींबद्दल माहिती देत असते. नुकताच सोनाली कुलकर्णीनेसोशल मीडियावरमकर संक्रांतीनिमित्त सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर मकर संक्रांतीच्या निमित्ताने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिचे पती नचिकेत यांच्यासाठी खास अंदाजात उखाणा घेताना दिसते. त्यादरम्यान व्हिडीओमध्ये सोनाली म्हणते, "संक्रांतीच्या निमित्ताने मोडली मी घडी, नचिकेतचं नाव घेते..." असा उखाणा अभिनेत्रीने घेतला आहे. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान, सोनालीने या व्हिडीओमध्ये मकर संक्रांत स्पेशल लूक सुद्धा केलेला पाहायला मिळतोय. काळ्या रंगाची सिल्क साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करुन अभिनेत्री छान तयार झाली आहे. शिवाय या लूकल साजेशी नथ देखील तिने घातली आहे. अभिनेत्रीचा हा सुंदर लूक पाहून तिच्या चाहत्यांनी देखील व्हिडीओवर कमेंट्सच्या माध्यमातून तिला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.