राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचे 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munna Bhai MBBS) आणि 'लगे रहो मुन्ना भाई' (Lage Raho Munna Bhai) हे लोकप्रिय चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर पैसा तर कमावलाच. पण, हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमसाठी घर करुन बसले. सिनेमांची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली. संजय दत्त (Sanjay Dutt) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या 'मुन्नाभाई' आणि 'सर्किट' या व्यक्तीरेखा तुफान लोकप्रिय ठरल्या. आजही संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना याच व्यक्तीरेखांच्या नावाने ओळखले जाते. पण, अर्शद वारसीच्या आधी 'सर्किट' ही भुमिका एक मराठमोळा अभिनेता साकारणार होता
सर्किट आजही सर्वांना आठवतो. ही भूमिका साकारली होती अभिनेता अर्शद वारसीने (Arshad Warsi) साकारली होती. या भुमिकेतून त्यांना प्रेक्षकांना भरभरुन हसवलं. पण, ही भुमिका आधी मराठमोळ्या मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांना ऑफर झाली होती. पण, त्यांनी नकार दिल्यानंतर अर्शद वारसीची निवड झाली. सायरस ब्रोचा याच्या पॉडकास्टमध्ये अब्बास टायरवाला याबद्दल सांगितलं होतं.
मकरंद देशपांडे यांनीही सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, राजकुमार हिरानी यांनी मला 'सर्किट'साठी ५६ दिवस मागितले होते. ही माझ्यादृष्टीने चुकीची बाब होती. माझ्या आयुष्यात मला नेहमीच एक गोष्ट माहीत आहे की माझा वेळ माझ्यासाठी मौल्यवान आहे आणि मला कोण भूमिका देत आहे आणि कोणती भूमिका देत आहे. किंवा त्या भूमिकेतून मला काय फायदा होईल? तुम्हाला प्रसिद्धी, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळेल की नाही? असे प्रश्न कधीच मला पडलेले नाहीत".
मकरंद देशपांडे हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आमिर खान आणि जुही चावला स्टारर 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आणि लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. वळ चित्रपटांमध्येच नाही तर अनेक टीव्ही शोमध्येही त्यांनी काम केलं आहे.