Join us

‘सैराट गर्ल’चा मेकओवर

By admin | Published: June 29, 2016 12:39 AM

सैराट मधील आर्चीच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रालाच झिंग चढली आहे.

सैराट मधील आर्चीच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रालाच झिंग चढली आहे. या चित्रपटातील आपल्या अदाकारीने रिंकू राजगुरू रातोरात स्टार झाली अन् असंख्य प्रेक्षकांच्या मनात तिने आपली जागा निर्माण केली. ‘सैराट’मध्ये गावरान बाज असलेली भूमिका करताना रिंकूने स्वत:ला अक्षरश: आर्चीमध्ये पूर्णपणे परावर्तितच केले होते. तिची डायलॉग म्हणण्याची स्टाईल असो किंवा झिंगाट डान्स रिंकूच्या अभिनयावर प्रेक्षकच नाही, तर आज हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील फिदा झाले आहेत. सलमान खान, आमीर खान, माधुरी दीक्षित यांसारख्या कलाकारांनी अभिनयाचे कौतुक केलेली रिंकू, आता आपल्याला एकदमच वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रिंकू सगळीकडेच टिपिकल आर्चीच्या लूकमध्ये दिसत होती. सलवार-कुर्ता, ओढणी, केसांची वेणी अशाच अंदाजात तिला सर्वांनी आत्तापर्यंत पाहिले होते, परंतु आता या ‘सैराट गर्ल’ने कात टाकली असून, ती आपल्याला वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. व्हाइट कलरचा सिल्क पंजाबी गळ्यात स्टायलिश ओढणी, मोकळे केस अन मेकअपचा टच देऊन रिंकू मॉडर्न लूकमध्ये आली आहे. तिच्या या लूकला सोशल मीडियावर लाइक्स मिळतच आहेत, परंतु प्रश्न असा पडलाय की, रिंकूचा हा मेकओवर फक्त चेंज म्हणून आहे की, कोणत्या नव्या चित्रपटातील भूमिकेसाठी, हे मात्र अजून तरी गुलदस्त्यातच आहे.