Join us

हॉटेल मुंबई या चित्रपटासाठी अशाप्रकारे केले गेलंय संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 9:00 PM

26/11 ला ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित हॉटेल मुंबई हा चित्रपट आहे.

ठळक मुद्देअँथोनी सांगतात, दहशतवादी हल्ल्याच्यावेळी खरे काय झाले हे समजून घेणे गरजेचे होते. जवळजवळ एक वर्षं तरी या चित्रपटासाठी आम्ही संशोधन केले. आम्ही या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांशी बोललो.

अँथॉनी मार्स या ऑस्ट्रेलियन फिल्ममेकरने आजवर अनेक चांगल्या शॉर्ट फिल्मस बनवल्या असून त्यांच्या अनेक शॉर्ट फिल्मसना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. द पॅलेस या ड्रॉक्युमेंट्रीला तर ॲमी या प्रतिष्ठीत पुरस्काराचे नामांकन देखील मिळाले होते. ही डॉक्युमेंट्री मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित होती. हा दहशतवादी हल्ला कसा झाला होता, लोकांनी आपले जीव कशाप्रकारे वाचवले होते हे या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आले होते. ही डॉक्युमेंट्री बनवताना या डॉक्युमेंट्रीच्या टीममधील लोकांना या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेल्या ताज हॉटेलच्या कर्मचारी आणि तेथील लोकांशी संवाद साधला होता. याच मुलाखतींच्याआधारे अँथॉनी मार्स आणि जॉन कॉली यांनी हॉटेल मुंबई हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. 

याविषयी अँथोनी सांगतात, दहशतवादी हल्ल्याच्यावेळी खरे काय झाले हे समजून घेणे गरजेचे होते. जवळजवळ एक वर्षं तरी या चित्रपटासाठी आम्ही संशोधन केले. आम्ही या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांशी बोललो. तसेच आम्ही पोलिसांशी तसेच ताजमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत बोललो. आम्ही ताजमध्ये एक महिना तरी राहिलो होतो. हा चित्रपट म्हणजे डॉक्युमेंट्री नाहीये. हा एक अतिशय भावनिक प्रवास असून हा चित्रपट पाहाताना सगळ्यांचे डोळे भरून येतील. हा चित्रपट पाहाताना आपण त्या क्षणी असतो तर आपले काय झाले असते हा विचार नक्कीच प्रत्येकाच्या मनात येईल. 

हॉटेल मुंबई या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते झी स्टुडिओज आणि पर्पज एन्टरटेन्मेंट असून हा चित्रपट 29 नोव्हेंबर 2019ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमीळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :हॉटेल मुंबई