अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा लेक अरहान खान यांच्यात खास बॉन्डिंग आहे. आई – मुलाच्या नात्याशिवाय मलायका आणि अरहान यांच्यात खास मैत्रीदेखील आहे. सध्या दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मलायका आणि मुलगा अरहान यांच्या Whatsapp chat व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये दोघांमधील मजेशीर संभाषण पाहायला मिळतंय.
अलिकडेच जगभरातमदर्स डे साजरा करण्यात आला. या खास दिवशी अरहाननेदेखील मलायका हिच्यासोबत लहानपणीचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. यासोबतच त्याने मदर्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर थेट दोघांचे Whatsapp chat चा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केलं. या Whatsapp chat मध्ये अरहान याने मलायकाला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्याच पाहायला मिळतं. अरहानने शुभेच्छा दिल्यानंतर मलायकाला त्याला "थँक यू" म्हणते आणि माझ्यासाठी काय गिफ्ट घेतलं असं विचारते.
यावर अरहान म्हणतो, "मी तुझे कपडे विकले आहेत". यानंतर तो रेड हार्ट इमोजी पाठवून "लव्ह यू' असे लिहतो. पुढे मलायका म्हणते, "पैशातून मला गिफ्ट आण…" यावर अरहान म्हणतो, "कपडे विकून आलेल्या पैशातून तुला गिफ्ट आणतो...". मलायका आणि अरहान यांचे Whatsapp chat जोरदार व्हायरल झाले आहेत.
अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान खानबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं आहे. काही वर्षे तो तिथंच होता. अनेकदा सुट्ट्यांमध्ये तो भारतात यायचा. तेव्हा मलायका आणि अरबाजही एकत्र त्याच्यासोबत वेळ घालवताना दिसले होते. काही दिवसांपुर्वीच त्याने 'डंब बिरयानी' हे पॉडकास्ट सुरू केलं आहे. अरहान हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.