बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर पोस्ट केली अन् ती व्हायरल झाली नाही, हे शक्यच नाही. सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असलेली मलायका रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे. होय, मलायकाने एक योगा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात मलायका एक कठीण आसन करताना दिसतेय. खरे तर मलायकाच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर अर्जुन कपूरची कमेंट अपेक्षित असते. पण यावेळी मलायकाच्या या हॉट व्हिडीओवर अर्जुन नाही तर त्याच्या काकांनी कमेंट केली आहे. होय, अभिनेते संजय कपूर मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
‘हे जग अनेक आव्हानांना कवेत घेतलेली एक सुंदर जागा आहे. आपला प्रवास आपल्याला बदलून टाकतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही ती म्हणजे आपल्याला गरजेची असलेली ताकद. जमेल त्या ठिकाणी झुकायला शिकले पाहिजे. ज्यामुळे तुटून पडण्याची वेळ क्वचित येईल,’ असा सुंदर मॅसेज या व्हिडीओसोबत मलायकने दिला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ आणि तिने दिलेला मॅसेज वाचून संजय कपूर भारावले आणि ‘वाह’ अशी कमेंट त्यांनी दिली.