Join us

Malaika Arora : प्रेग्नेंसीच्या वृत्तावर चांगलीच संतापली मलायका अरोरा, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 12:29 PM

Malaika Arora : मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

कलाकारांच्या बाबतीत नेहमी बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात. या काही अफवांमध्ये सत्य असते तर काही खोट्या असतात. साधारणपणे सेलेब्स या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाहीत, पण अनेकवेळा अशा बातम्याही समोर येतात, ज्यामुळे सेलेब्सना बोलायला भाग पडते. अशीच एक बातमी अलीकडेच आली होती की मलायका अरोरा (Malaika Arora) प्रेग्नंट आहे. यावर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका दोघेही चांगलेच संतापले आहेत. अर्जुन कपूरनंतर मलायकाही न्यूज साइटवर संतापली आहे.

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही बातमी घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. मलायकाने या फेक न्यूजसाठी न्यूज साईट आणि रिपोर्टरला फटकारले आहे. मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीवर रिपोर्टरच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.

मलायकाने लिहिले आहे की, हे सर्वात निम्न स्तराचं काम आहे जे तुम्ही करू शकता. असंवेदनशील राहून तुम्ही हे सहज लिहिलंय. ते अनैतिक आहे, कचरा आहे. असे खोटे गॉसिप लेख माध्यमांमध्ये पसरतात आणि मग खरे ठरतात. हे योग्य नाही. आमच्या वैयक्तिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका.

एका वेब पोर्टलने ही बातमी प्रसिद्ध केली होती की अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या घरी गुड न्यूज आहे. तसेच हे कपल ऑक्टोबरमध्ये लंडनला गेले होते, जिथे मलायकाने तिच्या जवळच्या लोकांसोबत प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती. या बातमीनंतर अर्जुन कपूरने लिहिले होते की, 'तुम्ही आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिम्मत करू नका.' आता मलायकानेही या वृत्तावर आपले म्हणणे मांडले आहे.मलायका आणि अर्जुन २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी मलायकाचे लग्न अरबाज खानसोबत झाले होते आणि दोघांना एक मुलगा आहे.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर