अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. तिचे अर्जुन कपूरसोबत अफेयर असल्याची सगळीकडे चर्चा आहे. याशिवाय बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटोंमुळेदेखील बऱ्याचदा ती ट्रोल होते. ती पुन्हा एकदा ट्रोल झाली असून यावेळेस ती वर्कआऊटच्या व्हिडिओमुळे ट्रोल झाली आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस क्रेझी आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. कधी कधी ती योगा करताना दिसते तर कधी जिममध्ये घाम गाळताना दिसते. ती नेहमीच आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता मलायकाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका पुन्हा एकदा जबरदस्त वर्कआऊट करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्सही पहायला मिळत आहेत.
तर दुसरीकडे काही सोशल मीडिया यूजर्स मलायका अरोराला ट्रोल करताना दिसत आहेत.
एका यूजरने तर कमेंट केली की, ‘जास्त उड्या मारू नको, म्हातारपणी एखादे हाड इकडे-तिकडे झाले तर खूप त्रास होईल.
तर एका यूजरने मलायकाला ट्रोल करत, हा स्टंट पाहून हिला आता पुढील वर्षी ऑलिपिंक स्पर्धेत पाठवावे लागेल, अशीही कमेंट केली.