Join us

अर्जुन-मलायकाच्या लग्नाला कधीचा मुहूर्त? वाचा, ‘मुन्नी’चे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 4:14 PM

नव्या वर्षाच्या मुहूर्ताला मलायका व अर्जुनने एकमेकांना किस करतानाचे फोटो शेअर केलेत आणि या नात्यावर नव्याने शिक्कामोर्तब झाले.

ठळक मुद्देअर्जुन व मलायकाच्या नात्याला दोन्ही कुटुंबाने मंजुरी दिली आहे.

मलायका अरोराअर्जुन कपूर याची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. एकेकाळी चोरून लपून भेटणारे हे कपल आता खुल्लमखुल्ला फिरताना दिसतेय. रोमॅन्टिक फोटो शेअर करून एकमेकांवरच्या प्रेमाची जाहीर कबुली देतेय. नव्या वर्षाच्या मुहूर्ताला मलायका व अर्जुनने एकमेकांना  किस करतानाचे फोटो शेअर केलेत आणि या नात्यावर नव्याने शिक्कामोर्तब झाले. आता मलायकाने अर्जुनसोबतच्या लग्नावर खुल्लमखुल्ला भाष्य केले आहे.

होय, 2020 मध्ये अर्जुनसोबत लग्न करणार का? असा प्रश्न मलायकाला एका ताज्या मुलाखतीत विचारला गेला आणि मलायकाने कुठलेही आढेवेढे न घेता या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘सध्या माझ्याकडे अनेक प्लान तयार आहेत. मी माझ्या टीमसोबत माझा बिझनेस वाढवण्यावर भर देतेय. मला काही मोठे करायचे आहे. 2019 हे वर्ष माझ्यासाठी चांगले राहिले. या वर्षाने मला बिझनेस वुमन ही ओळख दिली. नव्या वर्षांत मला हे स्थान आणखी भक्कम करायचे आहे. लग्नाचे म्हणाल तर सध्या याबद्दल बोलणे घाईचे ठरले. कारण एकावेळी एकच काम हे माझे तत्त्व आहे. आम्ही काय करतोय, हे आम्हाला दोघांनाही चांगले ठाऊक आहे. काही गोष्टी मार्गी लागल्यावर आम्ही लग्नाचे ठरवू,’ असे मलायकाने यावेळी सांगितले.

काही दिवसांपूर्वी अर्जुनही लग्नाबद्दल बोलला होता. आम्ही दोघेही पर्सनल व प्रोफेशनल लाईफमध्ये आनंदी आहोत. लग्नाचा निर्णय झाला की, मी स्वत:हून सर्वांशी शेअर करेल, असे अर्जुन म्हणाला होता.अर्जुन व मलायकाच्या नात्याला दोन्ही कुटुंबाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे कपल लग्नबेडीत अडकणार हे पक्के आहे. तूर्तास मात्र दोघेही लव्हलाईफ एन्जॉय करत आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर