Join us

Malaika Arora : मलायकाचा लव्ह गेम! अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर पुन्हा झालं प्रेम, मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:30 PM

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती पुन्हा प्रेमात पडल्याचं बोललं जातंय.

बॉलिवूड हॉट दिवा मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच चर्चेत असते. कधी ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत येते तर कधी बोल्ड फोटोशूटमुळे. अलिकडेच तिचं अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले जाते. ती ऑलिम्पिकदरम्यान काही काळ पॅरिसमध्ये सुट्टी एन्जॉय करत होती. तिने या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. अलिकडेच मलायकाने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये तिच्या पॅरिसमधील आठवणींना उजाळा दिला. मात्र, या फोटोंमध्ये तिच्यासोबत एका मिस्ट्री मॅनला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मिरर सेल्फीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो पाहून मलायकाच्या पुन्हा प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

मलायका अरोराने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती फ्रेंच डिशेसचा आनंद घेताना दिसत होती. तसेच पॅरिसच्या सुंदर रस्त्यावर फिरताना दिसते आहे. या व्हॅकेशनला तिचा स्टायलिश लूक पाहण्यासारखा आहे. या व्हिडीओत ती शहरातील सुंदर ठिकाणं आणि ओलंपिक विलेजमध्ये आनंद घेताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, सी एस्ट सी बॉन. पॅरिसमधील माझे ४८ तास. पूर्ण अनुभवासाठी ड्रिम सेट गो स्पोर्ट्सची आभारी.

मलायका अरोराच्या या व्हॅकेशन फोटोत मिस्ट्री मॅनही दिसला. हा व्यक्ती अभिनेत्रीसोबत मिरर सेल्फी काढताना दिसला. मलायका डीपनेक डेनिम आउटफिटमध्ये पोझ देताना दिसते आहे. हा फोटो पाहून नेटकरी ती पुन्हा प्रेमात पडल्याचं बोलत आहेत. यापूर्वी मलायकाने स्पेनमध्ये व्हॅकेशन व्यतित करणाऱ्या एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्या व्यक्तीचा फोटो अस्पष्ट असला तरी डेटिंगच्या अफवांना खतपाणी घालण्यासाठी ते पुरेसे होते. मात्र, तो कोण आहे हे आत्ताच सांगणे चुकीचे आहे. सोशल मीडियावर चाहते प्रश्न विचारत आहेत की तो व्यक्ती कोण आहे?

मलायकाची ही पोस्ट आली होती चर्चेत

अलिकडेच मलायकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली होती, ज्यात लिहिले होते की, "तुमचे सर्वात मोठे नाते हे तुमचे हृदय, मन आणि शरीराशी आहे. त्यांच्याशी दयाळूपणे वागा."  गेल्या काही आठवड्यांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर