Join us

"अभिनेत्याने ड्रग्सच्या नशेत चुकीचा स्पर्श केला", अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर थेट त्याचं नावच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:54 IST

एकीकडे अभिनेत्रीने नाव सांगितलं अन् दुसरीकडे पोलिसांनी छापेमारीत तोच अभिनेता पळताना दिसला

मल्याळम अभिनेत्री विंसी अलोशियसने (Vincy Aloshious) नुकतंच एका कोस्टारवर गंभीर आरोप केला. ड्रग्सच्या नशेत त्याने तिच्या ड्रेसला हात लावल्याचं ती म्हणाली होती. तसंच यापुढे ड्रग्स घेणाऱ्या कलाकारांबरोबर काम करणार नाही असंही तिने जाहीर केलं. आता अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत त्या कोस्टारचं नावच जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे कोची पोलिसांनी एका हॉटेलमध्ये ड्रग्ससंबंधी छापेमारी केली. त्या हॉटेलमध्ये असणारा अभिनेता शाइन टॉम चाको (Shine Tom Chacko) तिसऱ्या मजल्यावरुन फरार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पळताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे याच अभिनेत्याचं नाव विंसीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

'मनोरमा ऑनलाईन'रिपोर्टनुसार, बुधवारी रात्री नार्कोटिक्स विभागाने हॉटेलवर छापेमारी केली. पोलिसांना तशी टीप मिळाली होती. जसे पोलिस तिथे पोहोचले शाइन टॉम चाको आणि त्याचे दोन साथी फरार झाले. त्यांच्या खोलीतून ड्रग्स जप्त झालेले नाहीत. त्यांना छापेमारीबद्दल आधीच कळलं असावं असं पोलिसांचं म्हणणं आहे.

शाइन चाको यामुळे आता चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस मागे लागलेत आणि दुसरीकडे अभिनेत्री विंसीने त्याच्याविरोधात नशेत छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली आहे. तिने फिल्म चेंबरमध्ये अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे. चेंबूरचे महासचिव साजी नंथयाट यांनी विंसीच्या तक्रारीवर कडक कारवाई होईल अशी हमी दिली आहे. तसंच विंसीने असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सकडेही 'सूत्रवाक्यम'च्या सेटवर चाकोने गैरवर्तन केल्याची तक्रार दिली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीअमली पदार्थअटककेरळमीटू