बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव मल्लिका शेरावतने आणले समोर, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 12:31 PM2021-09-16T12:31:08+5:302021-09-16T12:31:28+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत 'नकाब' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

Mallika Sherawat brings the shocking reality of Bollywood to the fore | बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव मल्लिका शेरावतने आणले समोर, वाचून व्हाल हैराण

बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव मल्लिका शेरावतने आणले समोर, वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच काळापासून सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. मात्क आता ती नकाब या वेबसीरिजमधून कमबॅक करते आहे. नुकत्याच एका मुलाखतीत मल्लिका शेरावतने बॉलिवूडमधील धक्कादायक वास्तव सांगितले आहे. तिला बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचे तिने सांगितले. 

मल्लिका शेरावतने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबद्दल सांगताना म्हटले की, मी फारसा सामना केलेला नाही पण अर्थात मलाही असे काही अनुभव आले आहेत. मला वाटते लोक माझ्याजवळ येण्याआधीच घाबरून जायचे. मला अशी ऑफर देण्यापूर्वी पुरुष घाबरायचे. मी बोल्ड असल्यामुळे माझ्यासोबत गोष्टी उलट्या झाल्या. ही मुलगी गप्प राहणारी नाही या माझ्या प्रतिमेनेच मला मदत केली.


ती पुढे म्हणाली की, वाईट हेतू असणाऱ्या लोकांपासून मी नेहमीच दूर राहिली. कारण हे सगळे तेव्हा घडते जेव्हा तुम्ही स्वतःला त्या स्थितीत नेता.  मी कधीच कोणत्याही निर्मत्याला किंवा दिग्दर्शककाला नाईटला हॉटेलच्या रुममध्ये भटले नाही किंवा रात्री कोणाच्याही ऑफिसमध्ये गेले नाही. मी नेहमी या सगळ्यापासून दूर राहिले आणि हा विचार केला की, जे माझ्या नशिबात आहे ते मला निश्चितच मिळेल. 


माझ्यावर बरेच आरोप झाले आणि मला जज केले गेले. अशा परिस्थितीत पुरुष स्वातंत्र्य होवू लागतात. माझ्या बाबतीतही असेच घडले. मी अनेक प्रोजेक्ट गमावले आहेत कारण हिरो मला सांगायचे की, तू माझ्याशी इंटीमेट का होत नाहीस? जेव्हा तू हे सगळे पडद्यावर करू शकते, मग हे सगळे खासगी आयुष्यात करायला काय हरकत आहे? यामुळेच मी अनेक प्रोजेक्ट सोडले आणि गमावलेही, असे मल्लिका शेरावतने सांगितले.

Web Title: Mallika Sherawat brings the shocking reality of Bollywood to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.