ख्वाहिश, मर्डर, डरना जरूरी है अशा 40 चित्रपटांत काम करणारी आणि आपल्या हॉट अँड बोल्ड अवताराने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा आज वाढदिवस. दीर्घकाळापासून बॉलिवूडपासून दूर असली तरी मल्लिका चर्चेत असते. परदेशातल्या मोठ्या इव्हेंटमध्ये ती आवर्जुन दिसते.
तुम्हाला ठाऊक असेलच की, मल्लिका विवाहित आहे. होय, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच मल्लिकाचे लग्न झाले होते. आधी कुणालाही याची माहिती नव्हते. पण अचानक मल्लिकाच्या पहिल्या लग्नाचा खुलासा झाला होता. दिल्लीत राहणारा एक पायलट करणसिंग गिल याच्याशी तिचे लग्न झाले होते. पण मल्लिकाला बॉलिवूड खुणावत होते. मल्लिकाने बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे पतीपासून ती वेगळी झाली.
बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केल्या जाण्याच्या भीतीने मल्लिकाने एक ऑफर नाकारली होती. होय, ‘प्ले बॉय’ या जगप्रसिद्ध मॅगझिनने मल्लिकाला कव्हर पेजवर न्यूड पोज देण्याची ऑफरदिली होती. ही ऑफर मिळालेली मल्लिका पहिली भारतीय अभिनेत्री होती. पण मल्लिकाने ही ऑफर नाकारली. न्यूड पोज दिल्यास आपल्याला बॉलिवूडमधून ब्लॅकलिस्ट केले जाईल, अशी भीती तिला होती.