Join us  

प्रियंका चोप्रानं काय ठेवलं आपल्या लेकीचं नाव? जन्मानंतर तीन महिन्यांनी झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:21 AM

Priyanka Chopra Nick Jonas : अद्याप प्रियंकाच्या मुलीचा चेहरा दिसलेला नाही. इतक्या दिवसांपासून प्रियंकाने मुलीचं नावही जगापासून लपवून ठेवलं होतं. पण आता प्रियंकाच्या लेकीच्या नावाचा खुलासा झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिला याच वर्षी जानेवारीत कन्यारत्न झालं. सरोगसीद्वारे प्रियंका आणि निक जोनस आई-बाबा झालेत. अद्याप प्रियंकाच्या मुलीचा चेहरा दिसलेला नाही. इतक्या दिवसांपासून प्रियंकाने मुलीचं नावही जगापासून लपवून ठेवलं होतं. पण आता प्रियंकाच्या लेकीच्या नावाचा खुलासा झाला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंकाने खूप विचारांती मुलीच्या नाव ठरवलं. TMZच्या रिपोर्टनुसार, प्रियंका व निकने त्यांच्या मुलीचं नाव Malti Marie Chopra Jonas असं ठेवलं आहे. TMZने प्रियंकाच्या मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला आहे. या प्रमाणपत्रानुसार, प्रियंकाची लेक मालतीचा जन्म 15 जानेवारीला झाला. कॅलिफोर्नियाच्या San Diego येथे रात्री 8 वाजतानंतर तिने जन्म घेतला. अद्याप या वृत्ताला प्रियंका वा निकने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

प्रियंका आपल्या मुलीचं नाव निक आणि तिच्या संस्कृतीला लक्षात घेऊन ठेवणार असल्याचं याआधीच्या वृत्तात म्हटलं गेलं होतं. हे नाव म्हणजे दोन्ही संस्कृतीचा मिलाप असेल, असा दावाही करण्यात आला आहे. प्रियंकाच्या मुलीच्या ज्या नावाचा खुलासा झालाये, ते या दोन्ही संस्कृतीला दर्शवते.

प्रियंकाने 21 जानेवारीला आई झाल्याची घोषणा करत सर्वांना सुखद धकका दिला होता. कारण तोपर्यंत ती बेबी प्लान करतेय, याची भणकही कुणाला नव्हती. प्रियंका सरोगसीद्वारे प्रियंका आई बनणार, याचा अंदाज तोपर्यंत कुणालाच नव्हता. सध्या प्रियंका मातृत्वाचा आनंद घेत आहे. पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ दोन्हीं सांभाळण्याचा प्रयत्न करतेय.

काय होतो नावाचा अर्थ?मालती हा मूळ संस्कृत शब्द आहे.   याचा अर्थ लहान सुवासिक फूल किंवा चंद्रप्रकाश असा होतो.  मेरी हे लॅटिन भाषेतील नाव आहे. त्याचा अर्थ समुद्राचा तारा असा होतो. येशूच्या आईचे नावही मेरी होते. त्यामुळे प्रियंकाच्या लेकीच्या नावात हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही संस्कृतीचा मेळ दिसतो. मालती मेरीसमोर प्रियंका व निक यांनी आपआपलं आडनाव जोडलं आहे.

मी माझ्या मुलीची आई आहे. मालक नाही...अलीकडे प्रियंका तिच्या पालकत्वाच्या अनुभवाबद्दल बोलली होती. ‘पालक म्हणून माझा अनुभव छोटा आहे. पालकत्वाचा माझा प्रवास जरी नुकताच सुरु झालेला असला तरी पालकत्वाच्या भूमिकेबाबत काही विचारांवर आणि माझ्या मतांवर मी ठाम आहे. मी माझ्या मुलीची आई आहे. मालक नाही. तिच्यावर हक्क गाजवणारी मी कोण? आई आहे म्हणून मी तिचं संगोपन करायला हवं. तिचं संगोपन करताना  ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे याची जाणीव मी कायम ठेवायला हवी. मी कधीही माझ्या मुलीवर माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, माज्या मनातल्या भीती लादणार नाही. ती तिचं आयुष्य स्वत: घडवेल, असं ती म्हणाली होती.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास