लोकप्रिय मल्याळम अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोच्ची येथील रुग्णालयात ते अॅडमिट झाले आहेत. अभिनेत्याला खूप ताप आणि श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यांच्या मांसपेशीत प्रचंड वेदना जाणवत असल्याने तातडीने त्यांना नेण्यात आलं. त्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन होण्याचा धोका आहे.
मोहनलाल यांचं वय 64 वर्ष आहे. ऑफिशियल मेडिकल रिपोर्टनुसार, मोहनलाल यांना गर्दीत जाण्यास मनाई केली आहे. तसंच सर्व गोळ्या औषधं वेळेवर घेण्याचा सल्ला दिला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर श्रीधर पिल्लई यांनी हॉस्पिटलचं हे स्टेटमेंट शेअर केलं आहे. अभिनेत्याची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून सगळे प्रार्थना करत आहेत. सध्या हे ट्विट काढण्यात आलं असून अभिनेत्याच्या तब्येतीत सुधारणा आहे.
मोहनलाल 'एल 2: एम्पुरान'चं शूटिंग आणि त्यांच्या दिग्दर्शनात बनणारी पहिली फिल्म 'बरोज' च्या पोस्ट प्रोडक्शननंतर ते गुजरातवरुन कोच्ची ला परत आले. तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 'बरोज' यावर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.