मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नुकतीच नव्या घरात शिफ्ट झाली आहे. गृहप्रवेश पूजेचा आणि नवीन घरात पहिल्यांदा स्वयांपाक करतानाचा व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलं. काही महिन्यांपूर्वीच मानसीने प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. आता त्यातून ती हळूहळू सावरत आहे. सध्या तिने केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आहे.
घटस्फोटानंतर मानसी आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करत आहे. शक्य तितकं ती सकारात्मक राहत आहे. अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांना तिच्या मनात नक्की काय चाललंय हे सांगत असते. नुकतीच तिने केलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
मानसी लिहिते, "विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात, सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते, चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते… भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ."
मानसी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कामाबद्दल अप़डेट देत असते. तिला नृत्याची आवड आहे. अनेक नृत्याचे व्हिडिओ मानसी शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आता ती लवकरच 'सिफर' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.