Join us

‘या’ अभिनेत्रीसाठी वेडा झाला होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद, तिच्यासाठी काहीही करायला होता तयार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 1:21 PM

असे म्हणतात की, दाऊदच्या मनात एखादी अभिनेत्री भरली, को तिला मिळवण्यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जायला तयार असायचा.

ठळक मुद्दे1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.

अंडरवर्ल्डसोबतचे बॉलिवूडचे संबंध हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. या संबंधाच्या चर्चाही खूप गाजल्या. मग ते संजय दत्तचे अंडरवर्ल्डसोबतचे संबंध असोत किंवा मोनिका बेदीचे अबू सलेमसोबतचे प्रेमप्रकरण. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या पार्टीत दिसलेले बॉलिवूड स्टार्स आणि यावरून झालेला गदारोळही तुम्हाला आठवत असेलच.

बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसोबतचे दाऊदचे संबंध याचीही एकेकाळी हेडलाईन झाली होती. असे म्हणतात की, दाऊदच्या मनात एखादी अभिनेत्री भरली, को तिला मिळवण्यासाठी तो अगदी कोणत्याही थराला जायला तयार असायचा. मुंबईत दाऊदचा दरारा होता. दहतश होती, अशास्थितीत त्याला कोण नकार देणार? अशा काळात एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव दाऊदसोबत जोडले गेले होते. तिचे खरे नाव होते यास्मिन जोसेफ. चाहते तिला ओळखतात ते मंदाकिनी या नावाने.

वयाच्या 16 व्या वर्षी यास्मिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख दिली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या सिनेमात तिने दिलेल्या बोल्ड सीन्सची आजही चर्चा होते.1985 मध्ये ‘अंतारेर भालोबाशा’ या बंगाली सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती. याचवर्षी ‘मेरा साथी’ या सिनेमाद्वारे मंदाकिनीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1985 मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. यातला पहिला म्हणजे ‘आर पार’ आणि दुसरा म्हणजे, ‘राम तेरी गंगा मैली’. ‘राम तेरी गंगा मैली’ हा सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले.

अशातच दाऊदची नजर तिच्यावर पडली आणि तो अक्षरश: तिच्यासाठी वेडा झाला. यादरम्यान तिचा व दाऊदचा एक फोटो माध्यमांत झळकला आणि या फोटोने खळबळ निर्माण केली. इतकेच नाही तर मंदाकिनीने दाऊदसोबत लग्न केल्याच्याही चर्चा त्याकाळी रंगल्या होत्या.एका मुलाखतीत मंदाकिनी यावर बोलली होती. 1994 मध्ये प्रकाशित दाऊदसोबतच्या त्या फोटोने माझे आयुष्य बदलून टाकले. माझा व दाऊदचा एक मुलगा आहे, असाही दावा केला गेला. पण यात काहीही तथ्य नाही. शोसाठी मी सर्रास दुबईला जायचे. अशाच एका शोमध्ये मी दाऊदला भेटले होते. पण आमच्यात काहीही नव्हते, असे ती म्हणाली होती.

दाऊदसोबत नाव आल्याने मंदाकिनीला सिनेमे मिळेनासे झालेत आणि तिला फिल्मी करिअर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. 1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते.  1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली. जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.

टॅग्स :मंदाकिनीदाऊद इब्राहिम