बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. भाजपच्या तिकीटावर अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयाचा झेंडा फडकावला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे. दमदार व्यक्तिमत्व असलेल्या कंगनाला मात्र एक अशी गोष्ट आहे, जी येत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल खासदार झालेल्या कंगनाला गाडी चालवण्याची भीती वाटते.
कंगना हिनं स्वतः कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत ड्रायव्हिंगची भीती असल्याचं सांगितलं होतं. मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली होती, 'मला गाडी चालवण्याची प्रचंड आवड आहे. पण भीती वाटते. मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला होता, तर तिनदा माझा अपघात झालाय. यानंतर गाडीचं स्टिअरिंग पकडायला सुद्धा भीती वाटते, असं वाटतं मी पुन्हा एखाद्या गाडीला ठोकून देईल'. कंगनाला गाडी चालवण्याची भीती असली तरी ती महागड्या गाड्यांची शौकीन आहे.
खासदार झाल्यानंतर कंगना अभिनय कारकीर्द पुढे चालू ठेवणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. कंगनाचा मोस्ट अवेटेड चित्रपट "इमर्जन्सी' बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत असून प्रत्येकजण त्याच्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात ती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगना ही स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे, कंगना प्रत्येक मुद्द्यावर परखडपणे मत मांडते. कदाचित म्हणूनच तिला इंडस्ट्रीची क्विन देखील म्हटलं जातं. बॉलिवू़मध्ये आपल्या कामाने तिनं मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. आता राजकारणात कंगनाचे काम पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.