Join us

राजी...!! अर्ध्या रात्री पतीच्या आठवणीनं मंदिरा बेदी भावुक, शेअर केली मन हेलावून टाकणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 1:24 PM

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी अगदी कोलमडून गेली आहे. काल मध्यरात्री पतीच्या आठवणीने मंदिरा प्रचंड भावुक झाली.

ठळक मुद्देगेल्या 30 जूनला मंदिराचा पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. पतीच्या निधनानं मंदिराला मोठा धक्का बसला होता.

अभिनेत्री मंदिरा बेदीचे (Mandira Bedi ) पती राज कौशल (Raj Kaushal) यांच्या निधनानंतर कोलमडून गेली आहे. पतीच्या आठवणीने बेहाल झालीये. अगदी तहान-भूक आणि रात्रीची झोप सुद्धा विसरली आहे. काल मध्यरात्री पतीच्या आठवणीने मंदिरा प्रचंड भावुक झाली. इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहित तिनं तिच्या भावना व्यक्त केल्यात.मध्यरात्रीनंतर 2 च्या सुमारास मंदिरानं हीपोस्ट शेअर केली. पतीच्या निधनानंतर मंदिराची झालेली अवस्था या पोस्टमधून नेमकी समजू शकते. (Mandira Bedi Miss Her Husband) 

मंदिरानं पोस्टसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोत एका टिश्यू पेपरवर ‘राजी...’असं लिहिल्याचं दिसतंय.  फोटोच्या कॅप्शनमध्ये मंदिरानं ‘मिस यू राजी’असं लिहित पुढे तुटलेल्या हार्टचं इमोजी दिलं आहे.  मंदिराच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत दिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या 30 जूनला मंदिराचा पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. पतीच्या निधनानं मंदिराला मोठा धक्का बसला होता. राज यांच्या पार्थिवाला अग्नी देताना मंदिरा धाय मोकलून रडत होती. यावेळची तिची अवस्था हृदय हेलावणारी होती.मंदिरा व राज यांचे 1999 साली लग्न झालं होतं. लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघांना वीर नावाचा मुलगा झाला. गतवर्षी मंदिरा व राज यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होत. हे चौकोनी कुटुंब अगदी आनंदात आयुष्य जगत होतं. पण अचानक  राज कौशल यांच्यावर काळानं झडप घातली आणि मंदिरा व दोन्ही मुलं कायमची पोरकी झालीत.

टॅग्स :मंदिरा बेदी