Join us

Mandira Bedi ने पतीच्या आठवणीत शेअर केली अशी पोस्ट, व्हायरल झाला फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 16:41 IST

Mandira Bedi : मंदिरा बेदीने साडी नेसली होती. तिने लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. ती फारच सिंपल आणि एलिगंट दिसत होती.

Mandira Bedi : एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत ग्लॅमरचा तडका बघायला मिळतो. बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री एकापेक्षा एक भारी लूक करून एकताच्या पार्टीत पोहोचतात. यादरम्यान मंदिरा बेदीने (Mandira Bedi) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती साडीमध्ये फारच सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचे फोटो आल्यापासून फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत. ती आपल्या दोन मुलांसोबत तिथे पोहोचली होती.

मंदिरा बेदीने साडी नेसली होती. तिने लाल आणि काळ्या रंगाची साडी नेसली होती. ती फारच सिंपल आणि एलिगंट दिसत होती. मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं जून महिन्यात निधन झालं होतं. तेव्हापासून मंदिराने त्यांच्या आठवणीत अनेक पोस्ट शएअऱ केल्या आहेत. राजशिवाय तिची ही पहिली दिवाळी आहे. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने हृदय तुटलेलं इमोजी शेअर केला आहे.

गेल्या ३० जून रोजी मंदिरा बेदीच्या पतीचं निधन झालं होतं. मंदिराने त्यानंतर ३ जूनच्या रात्रीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून आपला प्रोफाइल फोटो काढला होता. तिने तिच्या फोटो ऐवजी एक ब्लॅक इमेज लावली होती.

मंदिरा बेदीने पतीचं अंत्यसंस्कारही स्वत:च केलं होतं. राज कौशलच्या अंत्यसंस्काराचे फोटो व्हायरल झाले होते. ज्यांमध्ये मंदिरा पूर्णपणे तुटलेली दिसत होती.  

टॅग्स :मंदिरा बेदीसेलिब्रिटीसोशल मीडिया