प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते, ते खरेच आहे. इंडियन आयडॉल 10 या भारतातील सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोचा र्ती सूत्रसंचालक मनीष पॉल आणि त्याची पत्नी संयुक्ता यांच्या बाबतीत ही उक्ती सिद्ध झाली आहे. या विनोदी नटाची संयुक्तासोबत एक गोड प्रेम कहाणी आहे. अगदी लहानपणापासून त्या दोघांत मैत्री होती. तिने कित्येकदा त्याचा गृहपाठ देखील पूर्ण केला होता. इंडियन आयडॉल 10 च्या शादी स्पेशल भागात मनीष पॉलने सांगितले की, जेव्हा मनीषने अभिनय क्षेत्रात संघर्ष करण्याचे ठरवल्यावर त्या दोघांनी 2008 मध्ये मुंबईस येण्याचे नक्की केले, तेव्हा कुटुंबाची जबाबदारी त्याच्या पत्नीने घेतली होती. इंडियन आयडॉल 10 मध्ये शादी स्पेशल भाग सादर होणार आहे, ज्यात निपुण दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि ज्येष्ठ गायिका रेखा भारद्वाज हजर असणार आहेत. मनीष पॉल सांगतो, “मी आणि संयुक्ता शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतो. तेव्हापासून तिने नेहमीच मला साथ दिली. माझा गृहपाठ करण्यापासून, माझ्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी देखील ती मदत करायची. 2007 मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो आणि 2008 हे वर्ष माझ्यासाठी खूप खडतर होते, कारण आमची उपजीविका चालवण्यासाठी माझ्या हातात काहीही काम नव्हते. ते संपूर्ण वर्ष तिने काम करून घर चालवले आणि मला मात्र तिने माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायला सांगितले. ती माझ्यासाठी हीरो आहे!” इंडियन आयडॉल 10च्या शादी स्पेशल भागात सर्वोत्तम 11 स्पर्धक विवाह विषयाशी सुसंगत अशी सुमधुर गाणी सादर करतील आणि आपल्या गायन कौशल्याने सर्वांचे मनोरंजन केले. सुनील ग्रोव्हर आपल्या गंमतींनी सर्वांना हसवेल.
मनीष पॉलने यशाचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 1:44 PM
इंडियन आयडॉल 10 या भारतातील सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोचा र्ती सूत्रसंचालक मनीष पॉल आणि त्याची पत्नी संयुक्ता यांच्या बाबतीत ही उक्ती सिद्ध झाली आहे. या विनोदी नटाची संयुक्तासोबत एक गोड प्रेम कहाणी आहे.
ठळक मुद्देअगदी लहानपणापासून त्या दोघांत मैत्री होतीतिने कित्येकदा त्याचा गृहपाठ देखील पूर्ण केला होता