'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 05:49 PM2024-04-30T17:49:15+5:302024-04-30T17:50:11+5:30

२८ वर्षांनंतर पुन्हा संजय लीला भन्साळींसोबत कमबॅक

Manisha Koirala was first offered Hum Dil De Chuke Sanam movie before Aishwarya Rai | 'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार?

'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार?

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) म्हणलं की त्यांचे 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम' सिनेमे डोळ्यासमोर येतात. 'हम दिल दे चुके सनम' मधून सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीने सर्वांनाच मोहित केले होते. सिनेमाची कथा, गाणी,भव्य सेट सगळंच खूप सुंदर होतं. ऐश्वर्याचं सौंदर्य तर या सिनेमात खुलून आलं होतं. सलमानने प्रेम आणि ऐश्वर्याने नंदिनी ही भूमिका साकारली होती. पण तुम्हाला माहितीये का ऐश्वर्याच्या जागी या भूमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्रीला ऑफर मिळाली होती.

संजय लीला भन्साळींनी 28 वर्षांपूर्वी 'खामोशी' हा सिनेमाही आणला होता. यामध्ये सलमान खानसोबतमनिषा कोईराला (Manisha Koirala) मुख्य अभिनेत्री होती. ई टाईम्सशी बोलताना मनिषा कोईरालाने'हम दिल दे चुके सनम'बाबत मोठा खुलासा केला. ती म्हणाली, "खामोशी नंतर माझं संजयसोबत छान बाँडिंग झालं होतं. आजही ते कायम आहे. अशात जेव्हा ते हम दिल दे चुके सनम बनवत होते तेव्हा आमचं बोलणं झालं होतं. मी तेव्हा नेपाळमध्ये आरामाचं आयुष्य जगत होते. तेव्हाच मला या सिनेमाची ऑफर आली होती. पण मी वैयक्तिक कारणांमुळे सिनेमा नाकारला. इतकंच नाही तर शाहरुखच्या देवदास साठीही संजयने मला संपर्क केला होता."

मनिषा कोईराला बऱ्याच वर्षांनंतर परत संजय लीला भन्साळींसोबत काम करत आहे. 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये तिची भूमिका आहे. उद्या १ मे रोजी नेटफ्लिक्सवर सीरिज प्रदर्शित होणार आहे. मनिषासोबतच सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्डा, आदिती राव हैदरी, संजीदा शेख, शरमिन सहगल या अभिनेत्री आहेत. तर फरदीन खान, शेखर सुमन आणि अध्ययन सुमन हे अभिनेतेही आहेत. 

Web Title: Manisha Koirala was first offered Hum Dil De Chuke Sanam movie before Aishwarya Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.