Join us

मनीषा कोईरालाचे आत्मचरित्र 'हील्ड' पुस्तकात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 9:00 PM

ओवेरियन कॅन्सरवर मात करणारी बॉलिवूडची अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिचा संघर्ष व खासगी गोष्टी 'हील्ड' या पुस्तकात लिहिले आहेत.

ठळक मुद्देमनीषाने नीलम कुमार यांच्यासोबत लिहिले पुस्तक

ओवेरियन कॅन्सरवर मात करणारी बॉलिवूडची अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिचा संघर्ष व खासगी गोष्टी 'हील्ड' या पुस्तकात लिहिले आहेत. मनीषा कोईरालाने नुकतेच पुस्तकाबद्दल ट्विटरवर सांगितले आहे. 

अभिनेत्री मनीषा कोईरालाने ट्विटरवर 'हील्ड' पुस्तकाचे मुखपृष्ठ शेअर करून ट्विट केले की, 'कर्करोगातून बरे होणे आणि पुन्हा जीवन नव्याने जगणे ही एकप्रकारे शिकवण आहे. '

मनीषाने नीलम कुमार यांच्यासोबत पुस्तक लिहिले आहे. पुस्तकावर उपशीर्षक दिले आहे कर्करोगाने मला नवीन जीवन दिले. मनीषाने कॅन्सरमधून बरे होणे आणि आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रवास तिने यात मांडला आहे. हा प्रवास म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचाच प्रयत्न आहे, असे तिने ट्‌विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या आजारपणाच्या काळात निकटवर्तीयांकडून मिळालेले सहकार्य, मदत, सहानुभूती आणि काळजी या सर्व अनुभवांचे मिश्रण तिच्या या आत्मचरित्रामध्ये व्यक्‍त केल्या असणार आहेत. कॅन्सरमधून बरे झाल्यावर सहा वर्षांनी तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आहे.संजूमध्ये तिने संजय दत्तची आई नर्गिस दत्तची भूमिका केली होती आणि ही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. त्याशिवाय नेटफ्लिक्‍सवरच्या लस्ट स्टोरीजमध्येही तिने काम केले होते. त्यातील देखील तिचे काम रसिकांच्या पसंतीस उतरले. आता तिच्या या पुस्तकातून तिच्या चाहत्यांना व प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. मनिषाच्या पुस्तकाची वाट तिचे चाहते आतुरतेने पाहत आहेत. 

टॅग्स :मनिषा कोईरालासंजू चित्रपट 2018लस्ट स्टोरीज