तेलुगू चित्रपट भव्यदिव्य असतात, त्यात मनोरंजनाचा सारा मसाला असतो, असं म्हटलं आहे अभिनेत्री मनीषा केळकर हिनं. वंशवेल, बंदूक अशा मराठी सिनेमात काम केल्यानंतर मनीषा आता आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज आहे. ती तेलुगू सिनेमात पदार्पण करतेय. तिच्या याच सिनेमाविषयी सीएनक्सने साधलेला हा दिलखुलास संवाद.मराठी सिनेमानंतर आता तुझी नवी इनिंग सुरू होतेय, तीसुद्धा वेगळ्या भाषेतील सिनेमात तुझ्या या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल?भाषेला कोणत्याही सीमा, बंधन नसतात, असं मी मानते. आजवर मराठी, हिंदी सिनेमात काम केलं, खूप मजा केली आणि करतेच आहे. मात्र, फ्रेंड रिक्वेस्ट या तेलुगू सिनेमाची आॅफर आली तेव्हा ती स्वीकारण्यासाठी जराही वेळ लागला नाही. कारण एक्शन, हॉरर आणि थ्रिलर असा तिहेरी संगम एखाद्या सिनेमात फार पाहायला मिळत नाही, जो या सिनेमात आहे. त्यातच माझी भूमिकाही यांत वेगळी आहे.‘फ्रेंड रिक्वेस्ट’ या सिनेमात तू कॅटवुमन साकारतेय, असं ऐकायला मिळालंय. यात कितपत तथ्य आहे?या सिनेमातली माझी भूमिका खूपच वेगळी आहे. लूकपासून ते तिच्या विचारापर्यंत सारं काही आगळंवेगळं असून अशी भूमिका मी आजवर साकारली नव्हती. या भूमिकेचं नाव किशा असं आहे.. ती कॅटवुमन नाही.. कदाचित कॉश्च्युुममुळं तसा समज झाला असावा. मात्र, या सिनेमात बॉडीसूट परिधान केलाय.. कारण ही पूर्णपणे अॅक्शन भूमिका आहे.. तर त्यासाठी खास बॉडीसूट डिझाईन करावा लागला.. याशिवाय फिटनेसवरही मला बरीच मेहनत घ्यावी लागली.. अशा सूटमध्ये फिट व्हायचं असले तर तुमची बॉडी फुल टोन असली पाहिजे. त्यासाठी खूप वजन कमी केलंय..मराठीत काम करता करता अचानक तेलुगू सिनेमा, कसे जुळून आलं हे सारं?आदित्य ओम या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत मी बंदूक हा मराठी सिनेमाही केला होता. त्यांनी इतक्या सुंदररित्या किशाची भूमिका आणि संपूर्ण स्क्रीप्ट मला समजावली की त्यानंतर मात्र मी मागे वळून पाहिलंच नाही.या सिनेमात भूमिकेची तयारी करण्यासाठी काय काय विशेष केलंस? तसंच तू अॅक्शन करतानाही दिसणार आहेस. या विषयी काय सांगशील?ही भूमिका रसिकांना घाबरवणारी आहे.. या सिनेमात भूतं आहेत.. फुल्ल आॅन हा नव्या युगातला हॉरर सिनेमा आहे. भूतं पळवण्यासाठी आपण सिनेमात मांत्रिक पाहिलेत.. मात्र या सिनेमात वेगळ्या पद्धतीने भूतांना पळवल्याचं अनुभवता येईल.. जे हिंदी सिनेमातही दाखवलं गेलेलं नाही आणि ज्या पद्धतीने हॉलिवूडमध्ये दृष्ट आणि भूतांचा संहार केला जातो.. त्याच पद्धतीनं यांत भूतांना पळवल्याचं रसिकांना पाहता येणार आहे.. माझ्या पात्रात म्हणजेच किशामध्ये बऱ्याच शक्ती आहे.. ती खूप पॉवरफुल्ल आहे.. तिचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त आहे.. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते समजण्याची शक्ती तिला प्राप्त आहे.. मला वेगळ्या रितीने ती भूमिका साकारता आली.. ती जगता आली आणि ती तुम्हालाही नक्की आवडेल असं मला वाटतं.नवी भाषा, नवीन लोक, सगळं काही नवीन, वेगळ्या वातावरणात काम करण्याचा अनुभव कसा होता... मराठी आणि तेलुगूमध्ये काही फरक जाणवला का?कुठल्याही सिनेसृष्टीची तुलना करणं योग्य होणार नाही. एखादी सिनेसृष्टी चांगली.. दुसरी वाईट असं नसतं.. ज्या लोकांसोबत काम करतो.. ज्या टीमसह वावरतो. ती टीम चांगली निवडावी,.. तर सिनेमा नक्कीच चांगला होतो असं मी समजते..अनेक मराठी, हिंदी कलाकार तेलुगू सिनेमात काम करतात. काय खासियत आहे तिथल्या सिनेमांची ?तेलुगू सिनेमा खूप भव्य दिव्य असतात.. या सिनेमात सारं काही असतं.. सगळा मसाला तुम्हाला तेलुगू सिनेमात अनुभवता येतो ‘तुझी फ्रेंड’ रिक्वेस्ट रसिकांनी का अॅक्सेप्ट करावी, असं तुला वाटतं?हा सिनेमा पाहून माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचं माझ्यावरील प्रेम आणखी वाढेल असं वाटतंय. या सिनेमात मी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, हा प्रयत्न सगळ्यांना नक्की आवडेल अशी आशा आहे. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासोबत अशाच कायम राहू द्या.
- suvarna.jain@lokmat.com