Join us

‘सत्यमेव जयते’मध्ये पाहायला मिळणार मनोज बाजपेयी आणि अमृताची हलकीफुलकी,प्रेमळ केमिस्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 3:19 PM

मिलाप झवेरी दिग्दर्शित‘सत्यमेव जयते’ सिनेमाची जो येत्या१५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘राझी’च्या मुनिरानंतर आता सर्वत्र चर्चा आहे ती ‘सत्यमेव जयते’मधील सरिताची. मिलाप झवेरी दिग्दर्शित‘सत्यमेव जयते’ हा अभिनेत्री अमृता खानविलकरचा आगामी हिंदी सिनेमा आहे.या सिनेमात अमृताने सरिता हे पात्रं साकारलं आहे जी भारतीय पोलिसाची पत्नी दाखवली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने भारतीय पोलिसाची पत्नी म्हणून तिच्या असणा-या जबाबदा-या तिने कशारितीने पेलल्या आहेत आणि कुटुंबामधील स्त्री म्हणून एकंदरीत तिचा घरात असलेला वावर या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या पात्राचे वैशिष्ट्ये म्हणजे या पात्रामुळे अमृताचे ख-या आयुष्यातील राहणीमान, तिचा स्वभाव कसा आहेयाचा अंदाज येणार आहे. कारण जसा अमृताचा स्वभाव आहे अगदी तसाच सरिताचा पण आहे.

अभिनेता मनोज बाजपेने या सिनेमात अमृताच्या अर्थात सरिताच्या पतीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे भारतीय पोलिसाच्या भूमिकेत असलेले मनोजजी यांच्यासोबत अमृता स्क्रिन शेअर करणार याचा आनंद नक्कीच सर्वांना असेल आणि या निमित्ताने त्यांच्यामध्ये असलेल्या नवरा-बायकोची केमिस्ट्री देखील अनुभवयाला मिळेल. मनोजजी जरी शिस्तप्रिय आणि रागीट दिसत असले तरी ते स्वभावाने खूप शांत आणि खोडकर स्वभावाचे आहेत,असे अमृताने सांगितले. एकत्र सीनच्या दरम्यान मनोजजींच्याअभिनयात गुंग झालेल्या अमृताला‘अगं लाईन घे...’ असे सांगून तिला भानावर आणले. 

ऑफ स्क्रिन सेटवर त्यांना अनेक प्रश्न विचारुन अमृताने इतकी मस्ती केली की मनोजजींनी सरळ सांगितले की अमृता इंटरव्ह्यु घेते. यावरुन असा अंदाज येतो की ऑफ स्क्रिन जशी त्यांची हलकी-फुलकी,सर्वांच्या पसंतीस पडेल अशी जोडी आहे तर पडद्यावरही देखील ही केमिस्ट्री प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.मनोजजींसोबत अमृताला हँडसम हंक जॉन अब्राहमसोबत पण काम करण्याची संधी मिळाली. कलाकार म्हणून हे दोघेही कसे आहेत ते प्रेक्षक पाहतातच पण माणूस म्हणून ते कसे आहेत हे अनुभवण्याची संधी अमृताला मिळाली. जॉन एक कलाकार म्हणून चांगला आहेच पण त्याहून तो खूप जास्त चांगला माणूस आहे, त्याच्या कामाप्रती असलेली एकनिष्ठता, सर्वांसोबत मिळून-मिसळून राहणे आदी त्याचे गुण अमृताने जाणले.या दोन उत्तम कलाकारांसोबत अमृताने केलेले काम पाहण्यासाठी नक्कीच सर्वांना आतुरता असेल तर आता प्रतिक्षा फक्त मिलाप झवेरी दिग्दर्शित‘सत्यमेव जयते’ सिनेमाची जो येत्या१५ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :मनोज वाजपेयीसत्यमेव जयते चित्रपटअमृता खानविलकर