Manoj Bajpayee Video: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी हे २३ एप्रिलला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनेक सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच मनोज वाजपेयी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या पद्धतीचं सध्या देशात वातावरण आहे त्यात काही लोकांना हा व्हिडीओ खूपड आवडला आहे.
व्हिडीओत मनोज वाजपेयी आजच्या काळात देशात हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढत असलेल्या अंतरावर बोलताना दिसत आहे. मनोज म्हणतात की, 'भगवान और खुदा आपस में बात कर रहे थे, मंदिर और मस्जिद के बीच चौराहे पर मुलाकात कर रहे थे, कि हाथ जोड़े हुए हों या दुआ में उठें, कोई फर्क नहीं पड़ता है.' बघा खास व्हिडीओ...
दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ही कविता लिहिली असून २०२० च्या मे महिन्यात लॉकडाऊन दरम्यान हा व्हिडी शेअर केला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कवितेत मिलाप झवेरी यांनी जे लिहिलं की त्याचं खूप कौतुक केलं जात आहे.
मिलाप झवेरी यांनी 'सत्यमेव जयते' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ज्यात मनोज वाजपेयी यांनी पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. यात जॉन अब्राहम याचीही भूमिका होती. मनोज वाजपेयी यांनी 'बॅंडीट क्वीन'पासून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांच्या अदाकारीचे लोक फॅन्स आहेत. मनोज लवकरच 'मुगल रोड', 'कॅम्पस' आणि 'राख'सारख्या सिनेमात दिसणार आहे.