Join us

"चांगले अभिनेते पण त्यांची नियत..." नसीरुद्दीन शाहांवर भडकले मनोज तिवारी, 'हिंमत असेल तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 9:37 AM

'द केरळ स्टोरी' सिनेमावरुन वाद, आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत.

'द केरळ स्टोरी' सिनेमावरुन वाद, आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. नुकतंच अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सिनेमावर टीका केली. चित्रपट पाहिला नाही आणि पाहणारही नाही असे त्यांनी सांगितले. तसंच हा सरकारचा कट असून त्यांनी नाझी आणि हिटलरशाहीशी याची तुलना केली. नसीरुद्दीन शाह यांच्या या टीकेवर भाजप नेते आणि अभिनेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी आक्षेप घेतला आहे.

मनोज तिवारी भडकले 

'द केरळ स्टोरी' वरुन नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर मनोज तिवारी भडकले आहेत. ते म्हणाले, "नसीरुद्दीन शाह अभिनेते म्हणून चांगले आहेत मात्र त्यांची नियत खराब आहे. केरळ स्टोरी सिनेमा एफआयआरच्या आधारावर बनला आहे. तुमची जर हिंमत असेल तर याविरोधात कोर्टात जा. बोलणं सोप्पं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी हे वक्तव्य करत स्वत:चा जो परियच दिलाय तो एक भारतीय म्हणून खूपच वाईट आहे."

'पाहिला नाही अन् पाहणारही नाही', केरळ स्टोरीवरुन नसीरुद्दीन शाह भडकले, "हा तर सरकारचा..."

काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

'अफवाह', 'भीड', 'फराज' सारखे चित्रपट बॉक्सऑफिसवर आपटले. पण केरळ स्टोरीने धुमाकूळ घातला आहे. लोक केरळ स्टोरीबाबत मोठमोठ्या गोष्टी करत आहेत. हा एक ट्रेंड आहे. मी अद्याप हा सिनेमा बघितलेला नाही आणि माझी बघायची इच्छाही नाही, अशी प्रतिक्रिया नसीरुद्दीन शाह यांनी दिली आहे.

मुलींचे ब्रेनवॉश करुन त्यांना ISIS मध्ये सामील करुन घेतलं जातं. केरळमधील हजारो मुलींचं अशा प्रकारे ब्रेनवॉश झालं आहे. याच पीडितांवर 'द केरळ स्टोरी'चं कथानक बेतलेलं आहे. सिनेमा रिलीजपूर्वीच वादात अडकला होता. सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच चर्चांना उधाण आलं होतं. रिलीजनंतर कित्येक आठवडे उलटले तरी ही चर्चा काही थांबत नाही. मात्र वादात असतानाही प्रेक्षकांना सिनेमा आवडला आहे.  तर कमल हसनसोबतच काही कलाकारांनी फिल्म प्रोपगंडा असल्याचं म्हटलं आहे. यामुळे सोशल मीडियावरही सिनेमावर टीकाटिप्पणी सुरुच आहे.  

टॅग्स :नसिरुद्दीन शाहभाजपाबॉलिवूडसिनेमाअदा शर्मा