प्रदीपला चांगला मुलगा म्हणणाऱ्या महिलेला मानसीनं चांगलंच झापलं, म्हणाली - 'देव करो तुझ्याबरोबर…'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 08:29 PM2022-12-24T20:29:25+5:302022-12-24T20:29:52+5:30
Manasi Naik : प्रदीप चांगला मुलगा होता म्हणणाऱ्या महिलेवर मानसी नाईक चांगलीच संतापली.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत आहे. मानसी नाईक लवकरच घटस्फोट घेणार आहे. मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार आहे. काही महिन्यांपूर्वी तिने घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता मानसीने इन्स्टाग्रामवर रिल व्हिडीओ बनवणाऱ्या एका महिलेला चांगलंच झापलं आहे.
मानसी नाईक हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिला ट्रोल केले. यात एका महिलेने तिच्या व्हिडीओखाली फालतू अशी कमेंट केली. तिची ही कमेंट वाचल्यानंतर मानसी संतापली. त्या कमेंटखाली मानसीने प्रतिक्रिया दिली आहे.
मानसी नाईक म्हणाली की, ही महिला माझ्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसते. जरा तरी शहाण्यासारखी वाग. अन्यथा मी तुझा पत्ता शोधून काढेन आणि पोलिसात तुझ्याविरोधात तक्रार करेन. तू चांगल्या घरातील वाटते. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करु नकोस, सावध राहा. त्यावर त्या महिलेनेही प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले की, मानसी तुला हवं ते तू कर. मला पर्वा नाही. मला जर काही आवडलं नाही तर मला त्यावर कमेंट करण्याचा अधिकार आहे. तू प्रदीपबरोबर लग्न केलेस तेव्हा खूप बरे वाटले होते, पण घटस्फोट घेतेस हे समजल्यावर मला अजिबात ते आवडले नाही. ही माझी जाहीररित्या नाराजी आहे.
त्यावर मानसी म्हणाली, “तू देखील माझ्याप्रमाणे Cat Mom आहेस. त्यामुळे नियंत्रणात राहा. तू व्हिडीओ बनवतेस ना, मग त्यात तुझ्या ऊर्जेचा वापर कर. काही तरी चांगल्या गोष्टी कर जेणेकरुन तुला पुढे जाण्यास मदत होईल. पण जर तुला मला ट्रोल करण्यासाठी पैसे मिळत असतील तर मी तुझ्या त्या कमेंट तशाच ठेवून तुला आणखी मदत करु शकते.
त्यावर त्या महिलेने म्हटले की, तुला ट्रोल करण्यासाठी मला कोणीही पैसे वैगरे देत नाही. तू माझी शत्रू नाहीस. मला तुझ्या भूतकाळातील काही गोष्टी आवडलेल्या नाही. ज्यामुळे मला तुझा राग आला आहे. पण आता भूतकाळ महत्त्वाचा नाही. जेव्हा तू लग्न केले तेव्हा मला खूप आनंद झाला होता. प्रदीप चांगला मुलगा होता. पण तू त्याला सोडल्यानंतर तुझ्याबद्दल अनेकांच्या मनात पुन्हा तेच विचार आले. मला माफ कर.. पण हेच सत्य आहे.
त्यानंतर मानसी म्हणाली की, मी तुझा नक्कीच आदर करते, पण एखादी गोष्ट पूर्ण माहिती नसेल तर त्याबद्दल मत ठरवू नका. मला हवं असेल तर मी तुमच्याशी तुमच्या कमेंटनुसार वागू शकते. पण तुम्ही आणि तुमच्या सारख्या असंख्य लोकांनी हे समजून घ्यायला हवं. तुमच्या कल्पनेपेक्षा वास्तविकता सर्वात वाईट असते. जर तुम्ही मला कलाकार म्हणून वागवले तर मला वाईट वाटेल कारण मी प्रसिद्ध आहे. पण तुम्ही माझ्याकडे चांगल्या पार्श्वभूमीची एक साधी मुलगी म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला कदाचित कल्पना येईल! हे माझे वैयक्तिक आयुष्य आहे आणि मी एका वाईट संकटातून वाचले आहे. देव करो तुझ्याबरोबर किंवा कधीच इतर कुणाबरोबर असे होऊ नये. लग्न हे पवित्र असते आणि मी पहिल्या दिवसापासूनच त्याचा आदर करत होती. त्याबद्दल नेहमीच आदर राहिलं.
त्यावर ती महिला म्हणाली, हा सर्व प्रकार याआधी माझ्याबरोबरही घडला आहे. तो तुझ्याबरोबर घडू नये, असे मला वाटायचे. पण जाऊ दे. उगाच लोकांना तमाशा दाखवण्यात काहीही अर्थ नाही. जर तुला बोलायचे असेल तर पर्सनलवर चॅट करु. नाहीतर जाऊ देत. तुझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलण्याचा मला काहीही अधिकार नाही. पण एवढेच वाटतेय की तू घटस्फोट घ्यायला नको होता. आणि हो काही गोष्टी माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे. त्यामुळे मला थोडा राग आहे. ते आता महत्त्वाचे नाही. पण तुझ्याबद्दल माझे मत तेच कायम राहिल आणि रागही…
साहजिकच मी तुला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. पण तू एक Cat Mom आहेस म्हणून तुला प्रतिक्रिया दिली. पण तुझे उत्तर वाचून मला समजले की तुला बरे होण्याची फार आवश्यकता आहे. तुझ्याकडे द्वेष आणि राग आहे. ज्याचा तुला फार त्रास होत आहे. यामुळेच कदाचित तुला पुढे जाता येत नाही. पण तू ते सोडून द्यायला हवं. एक कलाकार म्हणून माझे काम फक्त मनोरंजन करणेच नव्हे तर समाजाचा एक भाग म्हणून आजूबाजूच्या लोकांना मदत करणे हे देखील आहे. ते मी माझे कर्तव्य समजते. आपण प्रथम स्वत:चा आदर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपण इतरांचा आदर करण्यास सुरुवात करु शकतो. तुझ्यासारख्या मुलीला देव आणखी बळ देवो, असे मानसी नाईक म्हणाली.