Join us

Nandita Das : सावळेपणामुळे अभिनयापासून गेली दूर, 'मंटो' फेम नंदिता दासने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 9:07 AM

माझ्यावर लिहिले जाणारे लेखही  'डस्की ब्युटी नंदिता दास' अशा नावाने असतात.

Nandita Das : अभिनेत्री नंदिता दास नेहमी सामाजिक विषयांवर भाष्य करते. याचीच झलक तिने दिग्दर्शित केलेल्या आगामी 'झ्विगॅटो' या सिनेमात दिसून येते. नंदिताने अनेकदा रंगभेद आणि बॉलिवूडमधील ग्लॅमर सारख्या विषयांवर गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. नंदिता स्वत: सावळी असल्याने तिने अनेकदा यावरुन टोमणे ऐकले आहेत. याच कारणामुळे नंदिता अभिनयापासून दूर गेली. आता ती फक्त आवडीचे सिनेमे करते.

नंदिताने एका मुलाखतीत सांगितले,'समाजात रंगभेद अजूनही केला जातो. मलाही अनेकदा टोमणे मारले गेले आहेत. माझ्या कॉलेजमधील मुली मला विचारायच्या की इतका डार्क रंग असातानाही आत्मविश्वास कसा येतो. डार्क रंगाच्या लोकांना सिनेमात ठराविक भूमिका दिल्या जातात. ती एक खलनायिका असते किंवा सरळ साधी मुलगी. या देशात सावळे लोक सर्वात जास्त आहेत. सगळ्यांना गोरंच व्हायचं आहे. माझ्यावर लिहिले जाणारे लेखही  'डस्की ब्युटी नंदिता दास' अशा नावाने असतात. जसं काय माझी ओळख फक्त रंगावरुनच आहे.'

ती पुढे म्हणाली, 'मी कधीच फेअरनेस क्रीमचा वापर केला नाही. याचा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. क्रीम लावा गोरे व्हा असे होर्डिंग्स अनेक ठिकाणी असतात. लहानपणी नातेवाईक मला म्हणायचे तू खूप सावळी आहेस, उन्हात नको खेळू. मला हळद चंदन लावलं जायचं. मोठी झाल्यावर मला समजलं आणि मी यावर आवाज उठवला. ही माझी त्वचा आहे, माझा रंग आहे, माझं आयुष्य याचसोबत आहे आणि मी याचसोबत मरणार.'

सुरु केली मोहिम

नंदिताने याच कारणाने 'इंडियाज गॉट कलर'/'डार्क इज ब्यूटिफूल ही मोहिम सुरु केली. रंगावरुन केला जाणारा भेद थांबावा हे या मोहिमेचं उद्दिष्ट्य आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक माणसाला त्याच्या रंगाचा अभिमान वाटावा अशी संधी दिली जाते. यासाठी नंदिताने एक म्यूझिक व्हिडिओही तयार केला होता. अनेक सेलिब्रिटी याचा भाग होते.

दिग्दर्शिका नंदिता दास

नंदिता आता दिग्दर्शिका बनली आहे. नुकतेच तिच्या 'झ्विगॅटो' या सिनेमाचे ट्रेलर लॉंच पार पडले. नंदिताने याआधीही 'मंटो', 'फिराक' सारखे  अनेक हिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. 

टॅग्स :नंदिता दासमंटो