नात्यात बेबनाव : एका आठवडय़ात विभक्त होण्याची अनेक प्रकरणो उघड
अनुज अलंकार ल्ल मुंबई
मनोरंजन क्षेत्रतील जोडप्यांसाठी 2क्14 हे साल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ करणारे ठरले. कारण या मनोरंजन क्षेत्रतील अनेक जोडपी वेगळी किंवा घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याबाबत बातम्या प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रतील अनेक सेलीब्रिटी जोडपी घटस्फोटाचा मार्ग निवडताना दिसत आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतली काही प्रसिद्ध जोडपी घटस्फोट घेत आहेत. मात्र यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती हृतिक आणि सुझन यांच्यातल्या घटस्फोटाची. तर गेला आठवडा गाजला तो पूजा भट्टच्या बातमीने. पती मुनीशसोबत 11 वर्षाचे वैवाहिक संबंध संपवून घटस्फोट घेणार असल्याची बातमी खुद्द पूजानेच सोशल नेटवर्किग साइटवरून दिली. त्याच दिवशी छोटय़ा पडद्यावरील अभिनेता करण सिंग ग्रोवरनेही अभिनेत्री जेनिफर विंजेटबरोबरचे पाच वर्षाचे लग्नसंबंध संपुष्टात आणणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेच दुस:याच दिवशी टीव्ही स्टार दलजीत कोर आणि शालीन भनोत यांच्यात बेबनाव असून तेही घटस्फोट घेण्याच्या उंबरठय़ावर आहेत, अशी बातमी आली. या
जोडीने अजून त्यास दुजोरा दिलेला नाही.
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील जोडी फ्रीडा पिंटो आणि देव पटेल यांनी आपल्या संबंधाला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी यासंबंधीची घोषणा नुकतीच केली. तर इंद्र कुमारच्या ‘कमाल धमाल’ चित्रपटात अभिनय केलेला आशिष चौधरी आणि त्याची पत्नी स्मिता यांच्यातही तणाव असल्याच्या बातम्या आहेत. आशिषने याबाबत काही सांगण्यास नकार दिला आहे. मात्र ही बाब खरी असल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणो आहे.
बॉलीवूडमधील दोन अभिनेत्रींचे घटस्फोट प्रकरण न्यायालयार्पयत पोहोचले आहे. गेली अनेक वर्षे संजय कपूरपासून करिश्मा कपूर वेगळी राहत आहे. दोघांनीही घटस्फोटाच्या कागदांवर सह्या केल्याच्या बातम्या मीडियात आहेत. तर चित्रंगदा सिंग लवकरच ज्योती रंधावाबरोबर घटस्फोट घेणार आहे. पुढच्या आठवडय़ातच ही बातमी कळेल, असे सूत्रंकडून समजते. तर रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा यांचे संबंधही बिघडले असून त्यांच्यात समेट होण्याची शक्यताही मावळली आहे. याबाबतीत जरी मीडियासमोर बोलणो ते टाळत असले तरी दोघांच्या जवळच्या मित्रंकडून त्यास दुजोरा मिळाला आहे. सध्या वाढत असलेल्या या बातम्यांनी मात्र बॉलीवूडमधील इतर कपल्सना फारसा फरक पडलेला नाही.
नावीन्य नाही!
ज्येष्ठ पत्रकार विनोद मिरानी यांनी अशा घटस्फोट घेण्याच्या घटनांमध्ये नावीन्य नाही, असे म्हटले आहे. मनोरंजन क्षेत्रत काम करण्याची जी पद्धत आहे ती यासाठी नेहमीच जबाबदार राहील. कारण इथे काम करणा:या कलावंतांकडे कुटुंबासाठी, जोडीदारासाठी द्यायला वेळच नसतो. त्यामुळे तणाव जास्त वाढतो. येत्या काळात अशी आणखी प्रकरणो समोर येतील, असेही मिरानींनी सांगितले.