Join us
Daily Top 2Weekly Top 5

"औरंगजेबाचं वय बघता तो वेगाने चालू शकेल?" आस्ताद काळेच्या ५ पोस्ट; 'छावा' सिनेमावर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:13 IST

आस्तादने पोस्टमध्ये आणखी काय काय लिहिलंय वाचा...

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' ध(Chhaava) हा यावर्षीचा सर्वात गाजलेला सिनेमा. विकी कौशलने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्याचं भरभरुन कौतुक झालं. या सिनेमाने जनतेच्या मनावर खऱ्या अर्थाने राज्य केलं. सिनेमात संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी हे मराठी कलाकारही दिसले. आस्ताद काळेचीही (Aastad Kale) यामध्ये छोटी नकारात्मक  भूमिका होती. सिनेमाच्या रिलीज झाल्याच्या दोन महिन्यांनंतर आता आस्तादने सिनेमावर टीकेची झोड उठवली आहे. त्याने एकामागोमाग एक फेसबुक पोस्ट करत 'छावा'तील चुका दाखवल्या आहेत.

काय आहे आस्तादची पोस्ट?

अभिनेता आस्ताद काळेने फेसबुकवर ५ पोस्ट केल्या आहेत. तो लिहितो, "हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं????????!!!!काय पुरावे आहेत याचे????!!!!"

औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगानी चालू शकेल?

मी आता खरं बोलणार आहे...छावा. वाईट फिल्म आहे. फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.

सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका random नदी काठी???!!! असं नाही व्हायचं हो!!!!!

सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून "पान लावतायत"? आणि ते खातायत?हे कसं चालतं??!!!!

आस्तादच्या या पाचही पोस्टवरुन सोशल मीडियावर त्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. 'अरे मग तू का यामध्ये काम केलंस?','सिनेमा येऊन बरेच दिवस झाले आज का बोलतोय?' अशा कमेंट्स त्याच्या पोस्टवर येत आहेत.

टॅग्स :अस्ताद काळे'छावा' चित्रपटमराठी अभिनेताबॉलिवूड