'नगरसेवकाचा पगार २५ हजार अन् फॉर्चुनरचा हफ्ताच ३० हजार..नाही हो परवडत', आस्ताद काळेने राजकारण्यांवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:30 PM2021-04-29T17:30:25+5:302021-04-29T17:34:30+5:30

गेल्या काही दिवसांपासून आस्तादने सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करत आहे.

Marathi Actor Aastad Kale, expresses anger on maharashtra corporators and politicians | 'नगरसेवकाचा पगार २५ हजार अन् फॉर्चुनरचा हफ्ताच ३० हजार..नाही हो परवडत', आस्ताद काळेने राजकारण्यांवर साधला निशाणा

'नगरसेवकाचा पगार २५ हजार अन् फॉर्चुनरचा हफ्ताच ३० हजार..नाही हो परवडत', आस्ताद काळेने राजकारण्यांवर साधला निशाणा

googlenewsNext

आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेताय आस्ताद काळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्दयांवर आपले मत मांडत आहे. आता पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राजकारण्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय की, आत्ता महाराष्ट्रातील 'नगर"सेवकां"'चा पगार (सरकारी पगार) हा फारफारतर रुपये २५०००/- इतका आहे. A grade Municipal Corporation मधल्यांचा. ज्यात पुणे, मुंबई, आणि नागपूर येतात.आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलोय. २५००० रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!! Fortunerचा हफ्ताच ३००००/- वगैरे असेल!! असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया देत आपली मतं मांडताना दिसत आहेत.

 

 

नुकतेच आस्तादने देशातील राजकारणी, राज्य आणि केंद्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवाल केला आहे. त्याने देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररुप घेतलेले असताना देशात चार राज्यात निवडणुका झाल्या. त्यासाठी रॅली काढण्यात आल्या. त्यावर आस्तादने टीका करत म्हटले की, सरकारला प्रश्न विचारले पाहिजे तर काहीतरी होऊ शकते. निवडणुक अमूक काळ उलटल्यानंतर घेणे हे आपल्या संविधानात लिहिले आहे. पण ते परिस्थिती पाहून बदलू शकतो याची तरतूददेखील संविधानात केलेली आहे.

सध्याच्या घडीला निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे की परिस्थिती आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे एक वर्षे होते. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार..तुम्ही एका वर्षात केलंत काय ?, असा सवालही आस्तादने केला आहे.

Web Title: Marathi Actor Aastad Kale, expresses anger on maharashtra corporators and politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.